शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळातही अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:03 IST

यकृत केले दान : ज्येष्ठ नागरिकाला जीवदान; मुंबईत झाली प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

कल्याण : एकीकडे कोरोनाचे संकट गंभीर बनले असतानाही सोमवारी येथील एका खाजगी रुग्णालयात ६१ वर्षांच्या महिलेने मृत्यपश्चात केलेल्या यकृतदानामुळे ६४ वर्षांच्या नागरिकाला जीवदान मिळाले आहे. कोरोनाच्या काळातील हे पहिले अवयवदान डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. त्याचबरोबर अवयवदाना करण्याच्या आईच्या इच्छेमुळे एक जीव वाचू शकलो, हाच मोठा आनंद असल्याची प्रतिक्रिया महिलेच्या मुलाने दिली आहे.अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका महिलेला कल्याण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने अखेरीस डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केले. दरम्यान, या महिलेने मृत्यूपश्चात आपले अवयव दान करावे, अशी इच्छा जीवंतपणीच व्यक्त केली होती.संबंधित महिलेच्या पश्चात मुलगा, सून व मुलगी आहे. आईच्या इच्छेनुसार मुलांनीदेखील अवयवदानासाठी मंजुरी दिली. त्यानंतर रुग्णालयाने हालचाली सुरू करून महिलेचे यकृत मुंबईतील एका रुग्णाला देण्याचा निर्णय घेतला. मुंबईत एका खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यामुळे ६४ वर्षांच्या नागरिकाला पुनर्जीवन मिळाले.दरम्यान, खाजगी रुग्णालयाचे क्रिटीकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पाटील, न्युरोलॉजीस्ट डॉ. राकेश लल्ला यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक या कामासाठी सज्ज होते.‘अनेक आव्हाने असतानाही यश’अवयवदानाबद्दल रुग्णालयाच्या फॅसिलिटी डायरेक्टर डॉ. सुप्रिया अमेय म्हणाल्या की, अनेक आव्हाने व कोरोनाचे संकट असतानाही महिलेच्या कुटुंबाने अवयवदानास संमती दिली. रुग्णालय, नर्सिंग स्टाफ, झेडटीसी मुंबई, मेडिकल सोशल वर्क, पोलीस व नातेवाइकांचे सहकार्य यामुळे कोरोनाच्या काळातील हे पहिले अवयवदान यशस्वीरीत्या पार पाडले आणि एक जीव वाचवण्यात आम्हाला यश आल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Organ donationअवयव दान