शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटी मधील क्लब हाऊस, हॉल कोव्हीड केअर सेंटर घोषीत महापालिकेने काढला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:20 IST

महापालिका हद्दीत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीमधील क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून महापालिकेच्या वतीने घोषीत करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. त्यानुसार तसा आदेश काढण्यात आला असून तीन दिवसात सोसायटींनी त्या संदर्भात महापालिकेने दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहनही केले आहे.

ठाणे : दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातही यामध्ये अनेकांना या आजाराची कोणतीही लक्षणे नसलेले आणि त्रास नसलेले रुग्णांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे या रुग्णांच्या दृष्टीने महापालिकेने आता आणखी एक पाऊल उचलले आहे. एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचा कोणतेही लक्षणे नसलेला रुग्ण आढळला तर अशा रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थामधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषीत करण्यात आले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे. तसा आदेश पारीत करण्यात आला असून त्यानुसार या आदेशाची प्रत मिळाल्यापासून पुढील तीन दिवसात क्लब हाऊस आणि मल्टीपर्पज हॉल यासाठी आरक्षित करावेत असेही या आदेशात नमुद करण्यात आले आहे.           कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिस्तरीय वैद्यकीय आस्थापना निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. महापालिका हद्दीत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातही यामध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळ जवळ ८० टक्यांच्या आसपास आहे. परंतु ज्या रुग्णांना खरोखर रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांना रुग्णालय उपलब्ध व्हावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यानुसार आता सोसायटीमधील क्लब हाऊस किंवा मल्टीपर्पज हॉल हे आता कोव्हीड केअर सेंटर म्हणून घोषीत करण्यात आल्याचे आयुक्त विजय सिंघल यांनी स्पष्ट केले. त्यानुसार हे परिपत्रक प्राप्त झाल्यापासून पुढील तीन दिवसात गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी महापालिकेच्या coronacelltmc@gmail.com या मेल आयडीवर मेलद्वारे कोव्हीड केअर सेंटरची नोंदणी करावी, सदर क्लब हाऊसमध्ये संबधींत सोसायटीमधील सदस्यांना अलगीकरण करता येणार आहे. सोसायटीबाहेरील सदस्यांना त्यांच्या सोसायटी बाहेरील नातेवाईकांना सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये आणता येणार नाही, सोसायटीच्या क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला क्वॉरन्टाइन करणे, हे नियमानुसार असेल. या सेंटरमध्ये अलगीकरण झालेल्या सदस्यास त्यांच्या कुटुंबाकडून चहा, पाणी, नास्ता, भोजन आदी पुरविण्यात येईल, आवश्यक असल्यास त्यासाठी सेफ्टी कीट (मास्क) यांचा वापर करावा, कुटुंबातील सदस्यांनी क्वॉरन्टाइन सेंटरमध्ये ठराविक लांब अंतरावर खाद्यपदार्थ ठेवणे व क्वॉरन्टाइन झालेल्या सदस्याने सदरच्या बाबी तेथून स्वत: घेऊन जाणे आवश्यक राहिल. रुग्णास खाद्य पदार्थ देतांना नॉन रेस्युबेल साहित्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, संबधींत क्वॉरन्टाइन सेंटरची साफसफाई रुग्णांना स्वत: करावी लागले. किंवा पीपीई कीट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्याकडून अशी साफसफाई करुन घेता येईल.क्वॉरन्टाईन सेंटरमधून निघणारा कचरा हा बायो मेडीकल वेस्टला देणे बंधनकारक राहिल, संबधींत सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर्स अशा रुग्णांची देखभाल करतील, तथापी सोसायटीमध्ये वास्तव्याला डॉक्टर्स नसल्यास महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करुन घेणे सोसायटीला बंधनकारक राहिल. सोसायटीमधील देखरेख करावयाच्या डॉक्टर्सचे मानधन, देण्याची जबाबदारी संबधींत रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाची किंवा सोसायटीची असेल. संबधीत क्लब हाऊसमध्ये जम्बो आॅक्सीजन सिलेंडर, व आॅक्सीजन पुरविणारी मास्क ठेवणे संबधींत सोसायटीला बंधनकारक असणार आहे, जम्बो आॅक्सीजन सिलेंडर प्राप्त करुन घेण्यासाठी तांत्रिक सहाय्य सोसायटीमधील उपलब्ध डॉक्टर्स यांनी द्यायचे आहे. किंवा जर ते उपलब्ध नसेल तर आणि तांत्रिक सहाय्यक आवश्यक असल्यास सदरचे सहाय्य ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करुन दिले जाणार आहे.या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत व कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्याबाबत एक लेखी सहमती पत्र संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांनी परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून ३ दिवसाच्या आत ठाणे महापालिकेला लेखा कळवावे असेही महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या