शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहनची प्रतिमा सुधारण्याचे आदेश

By admin | Updated: July 28, 2016 03:42 IST

ठाणे परिवहनच्या कारभाराबाबत लोकमतमध्ये आॅन दी स्पॉट रिपोर्टरअंतर्गत केलेल्या झाडाझडतीनंतर त्याची दखल परिवहन समिती आणि महासभेने घेतल्यानंतर आता महापौर संजय मोरे

ठाणे : ठाणे परिवहनच्या कारभाराबाबत लोकमतमध्ये आॅन दी स्पॉट रिपोर्टरअंतर्गत केलेल्या झाडाझडतीनंतर त्याची दखल परिवहन समिती आणि महासभेने घेतल्यानंतर आता महापौर संजय मोरे आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील टीएमटीचा कारभार सुधारण्यासाठी मंगळवारी परिवहन प्रशासनाची तब्बल दोन ते अडीच तास झाडाझडती घेतली. यामध्ये परिवहनची प्रतिमा सुधारा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा समजवजा दमच प्रशासनाला या बैठकीत महापौर आणि आयुक्तांनी भरला.लोकमतने मागील आठवड्यात परिवहनमधील अनेक त्रुटींचा पाढा वाचला होता. कार्यशाळेबरोबरच कर्मचाऱ्यांचे प्रश्न, प्रशासनाची परिवहन प्रति असलेली मानसिकता या सर्वांचा समाचार घेतला होता. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र साप्ते, स्थायी समिती सभापती संजय वाघुले, सभागृह नेत्या अनिता गौरी आदींसह पालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत परिवहनच्या सध्या सुरू असलेल्या कारभाराचा समाचार घेतला. त्यानंतर, कामकाजाबाबत आणि काय समस्या आहेत, याचीही माहिती घेण्यात आली. परिवहनची प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी परिवहनचा कारभार सुधारण्याची जबाबदारी ही परिवहन प्रशासनाची असून तो सुधारण्यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन महापौरांनी या वेळी दिले. आपसातील हेवेदावे, मतभेद बाजूला सारून परिवहनचा गाडा सुरळीत हाकण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)किरकोळ साहित्याअभावीदेखील बस आगाराबाहेर का पडत नाहीत, याचीही माहिती या वेळी आयुक्त आणि महापौरांनी जाणून घेतली. त्या बाहेर न पडल्याने परिवहनचाच तोटा होत आहे, त्यामुळे त्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न झालेच पाहिजेत. बसदुरुस्तीसाठी आर्थिक मदत लागत असेल तर त्याचे प्रस्ताव तयार करून ते कायदेशीररीत्या मंजूर करून तत्काळ त्या दुरुस्त कराव्यात, असेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी जर काम करून रिझर्ल्ट दिला, तर त्यांच्या बाजूनेदेखील योग्य तो निर्णय घेतला जाईल.