शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा ऑडिटचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 23:37 IST

उल्हासनगरच्या महापौरांनी घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापौर लीलाबाई अशान यांनी आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. कोरोनाचा प्रादुर्भावा रोखण्यासह शहरातील कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी दिले.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात मनपाला यश आले असून तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापौरांनी ही बैठक घेतली. त्यात लसीकरणावर जोर देण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच दररोज १० हजारांपेक्षा जास्त कोरोना टेस्टिंगचे टार्गेट ठेवण्यात आल्याची माहिती नगरसेवक अरुण अशान यांनी दिली. कोरोनाकाळात स्मशानभूमीत लाकडे नसल्याने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अशा स्मशानभूमींच्या ट्रस्टींवर कारवाईचे आदेश महापौरांनी दिले. राज्यात कोविड रुग्णालयांना आगी लागून वित्त व जीवितहानी झाली. अशा घटना टाळण्यासाठी महापौरांनी शहरातील कोविड रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याचे तसेच रुग्णसंख्या वाढल्यास रुग्णवाहिका त्वरित पुरविण्याचे आदेशही दिले.

आयुक्तांनी भूमिका स्पष्ट केली नाहीमहापौरांनी शहरातील विकास कामे व विविध समस्यांबाबत आयुक्तांच्या उपस्थित शहरातील समस्यांचा उल्लेख करून वाहवा मिळविली. मात्र, १५ दिवसांच्या सुटीवरून पालिका सेवेत दाखल झालेल्या आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी साधी प्रतिक्रियाही व्यक्त केली नाही.

बैठकीला उपमहापौर भालेराव गैरहजरnया बैठकीला आयुक्त डॉ. राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, मदन सोंडे, मुख्य लेखा अधिकारी, विभागप्रमुख उपस्थिती होते. nयापूर्वी महापौर अशान व उपमहापौर भगवान भालेराव हे दोघे संयुक्तपणे अधिकाऱ्यांच्या बैठका घेत होते. मात्र, यावेळी उपमहापौर भालेराव महापालिकेत असूनही महापौरांच्या आढावा बैठकीकडे फिरकले नाही. गेल्या महिन्यात त्यांनी भाजप गोटात प्रवेश केला. म्हणूनच त्यांनी ही बैठक टाळल्याची चर्चा आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर