शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ होर्डिंग्जचे करारनामे रद्द करण्याचे आदेश; कारवाई होणार की नाही, उत्तर मात्र गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 23:51 IST

कारवाई होणार की नाही, उत्तर मात्र गुलदस्त्यात

ठाणे : फुटपाथ, रस्ते अडविणाऱ्या होर्डिंग्ज आणि शौचालय उभारण्याआधी ते उभारणाऱ्यांच्या विरोधात स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, त्यानंतरही साधी एक वीटही हललेली नाही. असे असताना आता या संदर्भात केलेले करारनामे इंग्रजीत असून, त्यावर स्थायी समिती सदस्यांची सही नसल्याने असे ते रद्द करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मंगळवारी दिले. यामध्ये आता सायकल स्टॅंडवर उभारलेले होर्डिंग्ज आणि मोबाइल ट्रॉली होर्डिंग्जचाही समावेश आहे. परंतु, ही कारवाई होणार का? की पुन्हा या सर्वांनाच याचा विसर पडणार याकडे लक्ष लागले आहे. 

स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत सभापती संजय भोईर यांनी रस्ते, फुटपाथ अडविणाऱ्या होर्डिंग्जवर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु, १५ दिवस उलटूनही त्यावर काहीच कारवाई झाली नसल्याचे उघड झाले. त्यामुळे मंगळवारी सभा सुरू होताच शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी या मुद्द्याला हात घातला. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केलेल्या जाहिरात होर्डिंग्जबाबतीत काय कारवाई केली. तसेच सभापतींनी दिलेल्या आदेशाचे काय झाले असे सवाल केले. शौचालयांच्या ठिकाणी आधीच होर्डिंग्ज कसे उभारले. असा प्रश्न त्यांनी केला. यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सहा ठिकाणी शौचालये उभारण्याआधीच होर्डिंग्ज उभारले असून, त्यांना नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, कारवाई काय केली? असा सवाल सदस्यांनी केला.  

याच मुद्द्याला धरून राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनीही या संदर्भात केलेला करारनामा हा इंग्रजीत आहे. तसेच त्यावर स्थायी समितीच्या सदस्यांच्या सह्यादेखील नाहीत. त्यामुळे हा करारनामाच अवैध असल्याचा दावा करून तो रद्द करण्याची मागणी केली. कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण यांनीदेखील मोबाइल ट्रॉली होर्डिंगही बेकायदापणे उभे असल्याचे सांगितले. तसेच सायकल स्टॅंडच्या ठिकाणी उभारलेले होर्डिंग्जमध्येही फसवणूक झाली असल्याने त्यांचेही करारनामे रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करावी, अशी मागणीही केली. त्याला हणमंत जगदाळे यांनी अनुमोदन दिले. सभागृहात झालेल्या चर्चेनंतर फुटपाथ, रस्ते अडविणाऱ्या होर्डिंग्जवर कारवाईचे आदेश सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाला दिले. तसेच शौचालय, मोबाइल ट्रॉली, सायकल स्टॅंडवरील होर्डिंग्ज संदर्भात केलेले सर्व करारनामे रद्द करावेत, असेही आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणे