शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

...अन् बालपणीच्या खेळांत रमले आजी-आजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 00:11 IST

विद्यानिकेतन शाळेत रंगले संमेलन : ४०० हून अधिक जणांनी घेतला सहभाग; संगीत, गायन, वादन, नृत्य मैफिलीचा लुटला आनंद

डोंबिवली : म्हातारपणातील सर्व व्याधी विसरून विटू-दांडू खेळण्यात कुणी मग्न होते, तर कुणी नातवाच्या शाळेत हरविलेले बालपण पुन्हा एकदा शोधत होते, कुणाला माहेरी आल्याचा भास झाला. पूर्वीच्या काळात अस्तित्वात असलेले एकमेव चॅनेलवरील निर्माते यांच्याशी साधलेला संवाद, त्या चॅनेलची धून, त्याकाळातील मालिकेचे पोस्टर यामुळे सर्वच जण भूतकाळात रमून गेले. निमित्त होते ते विद्यानिकेतन शाळेने घेतलेल्या आजी-आजोबा संमेलनाचे.

विद्यानिकेतन विद्यालयाच्या प्रांगणात आजी-आजोबा संमेलन सोमवारी भरविण्यात आले होते. शाळेचे संस्थापक विवेक पंडित अनेक वर्षे आजी-आजोबांसाठी हे संमेलन भरवत आहेत. शाळा हे एक कुटुंब आहे. कुटुंबातील प्रत्येक विद्यार्थ्याशी निगडीत पालकांसाठी त्यांच्या आजी-आजोबांसाठी अनेक उपक्रम हाती घेतले जात असतात. आपल्या नातवाला शाळेच्या बसस्टॉपपर्यंत आजी-आजोबा सोडत असतात. पण, आपल्या नातवाची शाळा कशी आहे, हे आजी-आजोबांना समजावे म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. या संमेलनात ४०० आजी-आजोबा सहभागी झाले होते. पालक सभा अथवा परीक्षांचा निकाल या दोन दिवशी विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येतात. त्यातही आई अथवा वडील उपस्थित राहून आपल्या मुला-मुलींच्या विकासाचा आढावा घेत असतात. आजी-आजोबा यांनीही या संमेलनामुळे आपल्या नातवांच्या शाळेत आनंदाचे क्षण घालवता आले. तसेच या संमेलनामुळे सुप्तगुणांना वाव मिळाल्याचे आजी-आजोबा सांगतात.

संमेलनाच्या निमित्ताने शाळेतील शिक्षकांनी आजीच्या हातावर मेंदी काढली. मुंबई दूरदर्शनच्या सुरुवातीच्या दशकात निर्माते असणारे विजया जोगळेकर-धुमाळे आणि विनय धुमाळे यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. पुढील काही दिवसांत मुलाखती घेण्याचा चार हजारांचा विक्रम करणाऱ्या सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पंडित यांनी त्याचा सत्कार केला. प्रवीण पाटील यांनी काढलेली पोर्ट्रेट त्यांना भेट देण्यात आली. दाजी पणशीकर यांनी मराठी सरस्वती स्तोत्र सादर केले. या संमेलनात जुने खेळ खेळून आजी-आजोबांनी बालपणीच्या आठवणी ताज्या केल्या. विटू-दांडूसह भोवरा, चिपी, गोट्या, सागर गोटे, ब्यालसिंग बीम यांसारखे विविध खेळ खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, नृत्य अशा सांगीतिक मैफिलीचे आयोजन केले होते.

शिक्षकांनीही या संमेलनाचा आनंद लुटला. आजी-आजोबांना कोणतीही गोष्ट कमी पडत नाही ना, याची काळजी पंडित यांनी घेतली.धुमाळे म्हणाले, ‘पूर्वीच्या काळी कार्यक्रमाची आखणी जी व्यक्ती करायची, तीच निर्माता असायची. जाहिराती जास्त नव्हत्या. सरकाराला दूरदर्शनाद्वारे कार्यक्रम करावे लागत होते, मात्र आता काळ बदलला आहे. पैसा खर्च करतो तोच निर्माता असे समीकरण झाले आहे. पूर्वीच्या काळातील निर्माता हा श्रीमंत होताच असे नाही. पैसा महत्त्वाचा नव्हता. त्यामुळे पूर्वीचा निर्माता आणि आतचे निर्माते यांच्यात खूप फरक आहे.... आणि वय विसरून गेलो!बालपणी खेळलेला विटू-दांडू गेली अनेक वर्षे हातातही घेतला नव्हता. आज विटू-दांडू पाहिला अन् खेळण्याचा मोह आवरला नाही. वय विसरून खेळात सहभागी झालो. या खेळात बालपण शोधू लागले. बालपणी विटू-दांडू खेळताना येणारी मजा पुन्हा अनुभवली. त्यामुळे चेहºयावर आनंद पसरल्याचे संमेलनाला पहिल्यांदाच आलेल्या आजी मधुरा मेहता सांगत होत्या. तर दुसरीकडे हातावर काढलेली मेहंदी, सकाळी नाश्त्यापासून जेवणापर्यंत केलेली सोय आणि आदरातिथ्य पाहून साºया व्याधी विसरून संमेलनात सहभागी झाल्याचे गोगटे आजींनी सांगितले.