शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांसाठी ‘मेट्रो’ वंजारपट्टीवरून नेण्यास दोन आमदारांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:20 IST

मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

भिवंडी : ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्प-५ अंतर्गत भिवंडीतील नियोजित मेट्रोमार्गात बदल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर या मार्गास आमदार महेश चौघुले व रईस शेख यांनी पाठिंबा दर्शवत विरोध करणाऱ्यांना समाजकंटक संबोधल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही आमदार हे रिलायन्स व इतर बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी काम करत असल्याने ते वंजारपट्टी नाक्यावरून मेट्रोमार्ग नेण्यास विरोध करीत आहेत, असा आरोप कल्याणनाका व्यापारी व रहिवासी संघर्ष समितीने गुरु वारी पत्रकार परिषदेत केला.नियोजित मेट्रोमार्गामुळे कल्याण रोड येथील तब्बल १२०० व्यापारी व १७०० रहिवासी यांच्या मालमत्तांवर टाच येत असून येथील व्यापारी, रहिवासी तीन वर्षांपासून या प्रकल्पाच्या नियोजित मार्गास विरोध करत आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना फायद्याचे ठरेल, यासाठी हा मार्ग वंजारपट्टी-चाविंद्रामार्गे टेमघर, कल्याणच्या दिशेने नेल्यास त्याचा फायदा अधिक नागरिकांना होऊ शकेल, असे संघर्ष समितीचे निमंत्रक शादाब उस्मानी यांनी स्पष्ट केले.आमचा मेट्रोस विरोध नसून त्याचा मार्ग संपूर्ण शहरासाठी सोयीस्कर असा वंजारपट्टीवरून नेण्यासाठी आमचा आग्रह आहे. नियोजित कल्याणनाका येथील मार्ग हा छोटे व्यापारी, गरीब कुटुंबीयांना उद्ध्वस्त करणारा आहे. या मार्गावरील व्यावसायिक व रहिवासी आतापर्यंत तीनवेळा रस्ता रुंदीकरणात बाधित झाले आहेत. त्यातच आता मेट्रोमुळे या मार्गावरील सर्व व्यावसायिक उद्ध्वस्त होणार असल्याने सुरुवातीपासून येथील नागरिकांनी या मेट्रोमार्गास विरोध केला आहे.पत्रकार परिषदेस संघर्ष समितीचे राम लहारे, दिन मोहम्मद खान, मेहमूद मोमीन, राकेश पाल, सुधाकर अंचन, नईम खान, युसूफ सोलापूरकर, अनिल माणिकराव, नवीन गंगाराम, अस्लम हाफिजी, मुजाहिद शेख मैनूल शेख आदी उपस्थित होते.>स्थानिकांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करून बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी हा मार्ग असल्याने व या परिसरात रिलायन्स प्रोग्रेसिव्ह ट्रेडर्स कंपनीच्या नावे जमीन खरेदी केली असल्याने त्यांच्या फायद्यासाठी भिवंडीतील आमदार कल्याण रोडच्या मार्गास पसंती देत असल्याचा आरोप उस्मानी यांनी केला.