शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

मजल्यावरील सर्वांना क्वारंटाइन करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 01:35 IST

नागरिकांचा आक्षेप : बाधितांनाच दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : कोरोनाचा एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोसायटीतील त्याच्या मजल्यावरील अथवा चाळीतील शेजाऱ्यांनाही तपासणी, उपचारांसाठी केडीएमसीच्या विविध कोविड सेंटरवर नेले जात आहे. तसेच त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल होण्याससांगितले जात असल्याने त्याला शहरातील नागरिकांनी विरोध केला आहे.खंबाळपाडा येथे राहणारे अक्षय फाटक यांनी मनपाच्या या भूमिकेला विरोध केला असून, आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या घरातील सगळ्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. परंतु, त्याच्या मजल्यावरील शेजाऱ्यांनाही अ‍ॅडमिट करून घेणे, चाचणी करायलालावणे, याला विरोध असल्याचे ते म्हणाले. संगीतावाडीतील रहिवासी व डोंबिवली नाभिक महामंडळाचे पदाधिकारी रमेश राऊत यांनीही मनपाच्या धोरणाचा विरोध केला आहे. मनपा हे योग्य करत नाही. यामुळे रहिवाशांमध्ये आपापसांत भांडणे होतील. तसेच संपूर्ण मजला, चाळ त्यामुळे टार्गेट करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.रुग्णाच्या मजल्यावरील सगळ्यांची चाचणी करावी, ज्यांना त्रास असेल त्यांनाच उपचारांसाठी हलवावे, पण सरसकट सगळ्यांना हलवणे हे योग्य नाही. त्याला विरोध असल्याचे नगरसेवक नितीन पाटील म्हणाले. आयुक्तांनी नगरसेवकांच्या बैठकीत प्रत्येक प्रभागात एक रुग्णवाहिका असेल, असे म्हटले होते. प्रभाग समितीला पाच रुग्णवाहिका दिल्या जातील, असे म्हटले होते. त्याचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. पाटील हे सध्या त्यांच्या प्रभागात विनामूल्य आॅक्सिजन पुरवत आहेत. दिवसाला सात जणांना त्याची गरज लागत असून मागणीत वाढ होत आहे. सिलिंडर घेणे, त्यात आॅक्सिजन रिफिल करणे, हे खर्चिक असते. ते सामान्यांना परवडणारे नाही, याचीही पालिकेने दखल घ्यावी, असे ते म्हणाले.कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने काही ठोस निर्णय घ्यावे लागले आहेत. त्यात हाय रिस्क आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट असे वर्गीकरण करून संबंधित नागरिकांना आयसोलेशन सेंटरमध्ये आणले जात आहे. त्यामध्ये सोसायटीतील एखाद्या मजल्यावरील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील बहुतांश जणांना तातडीने आयसोलेशन सेंटरमध्ये आणले जात असून, काहीशी सक्ती करणे अत्यावश्यक झाले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण असूनही नागरिक ऐकत नाहीत म्हटल्यावर हे पाऊल पालिकेला उचलावे लागले.- प्रतिभा पानपाटील,मुख्य आरोग्य अधिकारी, केडीएमसी