शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पप्पू कलानीच्या मुदतपूर्व सुटकेस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 06:34 IST

इंदर भटिजा हत्या प्रकरणात माजी आमदार पप्पू कलानी येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

- सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानीची मुदतपूर्व सुटका करणे योग्य नाही, असा अहवाल विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याने येरवडा कारागृहासह उल्हासनगरच्या सहायक पोलीस उपायुक्तांना पाठवला आहे. त्यामुळे त्याच्या मुदतपूर्व सुटकेची शक्यता मावळली आहे. 

इंदर भटिजा हत्या प्रकरणात माजी आमदार पप्पू कलानी येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याने मुदतपूर्व सुटका मिळण्यासाठी येरवडा कारागृहाकडे अर्ज केला होता. त्यानुसार, याबाबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचा अभिप्राय मागवण्यात आला होता. विठ्ठलवाडी पोलिसांनी याबाबत काय अहवाल दिला, याची माहिती या गुन्ह्यातील तक्रारदार व फिर्यादी कमल भटिजा यांनी मागितली होती. त्यानुसार, विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भोमे यांनी ८ एप्रिल रोजी येरवडा कारागृहासह उल्हासनगरच्या सहायक पोलीस आयुक्तांना दिलेल्या अहवालाची एक प्रत भटिजा यांना दिली. या अहवालात पप्पू कलानी याच्यावर एकूण ६५ गुन्हे दाखल असून, त्यापैकी १३ प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे म्हटले आहे. कलानीची मुदतपूर्व सुटका केल्यास तक्रारदाराच्या जीवितास, तसेच १३ न्यायप्रविष्ट प्रकरणांमधील साक्षीदारांना धमकावून त्यांना फितूर करण्याचा धोका पोलिसांनी वर्तवला आहे.

तसेच विठ्ठलवाडी पोलिसांनी विविध कारणे देत, पप्पू कलानीची कोणत्याही अटी व शर्तीवर मुदतपूर्व सुटका करू नये, असे स्पष्ट मत या अहवालाद्वारे नोंदवले आहे. हा अहवाल कमल भटिजा यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर खळबळ उडाली आहे.पॅरोलवर झालेली सुटकामहापालिका निवडणुकीपूर्वी पप्पू कलानीची पॅरोलवर सुटका केली होती. वय व चांगले वर्तन लक्षात घेता, कलानी याची मुदतपूर्वी सुटका होण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्यानंतर, कलानी यानेही तसा अर्ज येरवडा कारागृह अधीक्षकांकडे केला होता; मात्र विठ्ठलवाडी पोलिसांच्या अहवालामुळे त्याच्या सुटकेची शक्यता मावळली आहे.