शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लेले यांच्या स्वीकृतपदाला पक्षातूनच होतोय विरोध

By admin | Updated: March 30, 2017 05:42 IST

पक्षातील बंड थोपविण्यासाठी शिवसेना आणि भाजपाकडून नाराजांना स्वीकृत पदाचे गाजर दाखविले जात आहे. शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची

ठाणे : पक्षातील बंड थोपविण्यासाठी शिवसेना आणि भाजपाकडून नाराजांना स्वीकृत पदाचे गाजर दाखविले जात आहे. शिवसेनेकडून अनेक इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपाकडून शहर अध्यक्ष संदीप लेले यांचेच एकमेव नाव पुढे येत होते. परंतु, आता त्यांच्या नावाला पक्षातील दुसऱ्या गटाने विरोध करण्यास सुरुवात केली असून, शहर अध्यक्षपद आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हा गट पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे निवडणूक काळात असलेले गटबाजीचे ग्रहण निवडणुकीनंतरही पहावयास मिळत आहे.पालिका निवडणुकीमध्ये नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्यासाठी सर्वच पक्षांकडून नाराजांना स्वीकृत नगरसेवक पदाचे गाजर दाखवण्यात येत असले तरी भाजपामध्ये यावरून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष संदीप लेले यांना स्वीकृत नगरसेवकांचे पद देण्याच्या पक्षाच्या हालचालींमुळे एक गट नाराज असल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या काळात या गटाला डावलण्यात आल्याने आता त्याचा वचपा काढण्यासाठीच ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे पक्षाचे शहर अध्यक्ष पद देण्यावरूनही भाजपामध्ये गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहेत. स्थायी समितीसाठी ‘हाता’ची मदत घेऊन अवघे तीन नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाला शिवसेना पक्षाने तारले असून स्वपक्षातील नाराजांना स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखवण्यात येत आहे. यावेळी स्वीकृत सदस्यांची संख्या जास्त होण्याचा दावा करून नाराजांना खुश करण्याचे प्रयत्न सध्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहेत. याच हालचाली आता निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी ठरलेल्या भाजपाकडून सुरू झाल्या असून स्वीकृत नगरसेवक पद कोणाला द्यायचे यावरून पक्षामध्ये मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पदासाठी अजून कोण कोण इच्छुक आहेत हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी भाजपाचे विद्यमान अध्यक्ष संदीप लेले यांचे नाव या पदासाठी जवळजवळ अंतिम झाले आहे. लेले यांच्या नेतृत्वाखालीच ठाणे महापालिकेची निवडणूक झाली असल्याने पक्षालादेखील समाधानकारक यश मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे लेले यांना सभागृहात पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातीलच एका गटाचा विरोध असल्याने यावरून पक्षात मतभेद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. लेले यांच्या कामाबाबत अनेकांच्या तक्रारी पक्षाकडे आलेल्या आहेत. तसेच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरदेखील अनेकांनी नाराजी व्यक्त केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळेच निवडणुकीत ज्या गटाला दाबण्यात आले होते, तो गट आता पुन्हा पेटून उठण्याची चिन्हे असून सह्यांची मोहीम झाल्यानंतर लेले यांच्या विरोधातील पत्र श्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.दुसरीकडे अध्यक्षपदावरूनदेखील भाजपामध्ये दोन गट निर्माण झाले असून आपल्याच गटाकडे अध्यक्षपद मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरूनदेखील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. (प्रतिनिधी) अध्यक्षपदावरून भाजपात दोन गटलेले यांच्या कामाबाबत समाधानी नसणाऱ्यांनी एक मोहीम उघडली असून, नाराज असणाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे काम सध्या वेगात आहे. याबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सह्यांच्या मोहिमेबाबत तरी काही माहीत नसल्याचे सांगितले.दुसरीकडे अध्यक्षपदावरूनदेखील भाजपामध्ये दोन गट निर्माण झाले असून आपल्याच गटाकडे अध्यक्षपद मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरूनदेखील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.