शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते पहिल्या मजल्यावरच

By admin | Updated: April 12, 2017 03:44 IST

ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबीनचा मुद्दा अद्यापही सुटत नसल्याचेच चित्र आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी

ठाणे : ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या कॅबीनचा मुद्दा अद्यापही सुटत नसल्याचेच चित्र आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील आणि आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पुन्हा कॅबीनसाठी पाहणी केली. शिक्षण मंडळाच्या सभागृहात फार मोठे बदल करणे अपेक्षित असल्याने या कामाला उशिर होण्याची दाट शक्यता लक्षात घेता, पुन्हा तळ मजल्यावरील कॅबीनचा मुद्दा प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांकडे उपस्थित केला. परंतु, त्यांनी याला नकार दिला आहे. त्यामुळे अखेरीस शिक्षण मंडळाच्या सभागृहातच म्हणजेच पहिल्या मजल्यावर आता विरोधी पक्षनेत्यांचे कॅबीन असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे महापालिकेने दुसऱ्या मजल्यावर असलेले विरोधी पक्षनेत्यांचे कॅबीन तळमजल्यावरील काँग्रेसच्या कॅबीनमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तिचे कामही सुरु झाले होते. परंतु, ही कॅबीन स्वीकारणार नसल्याचे पत्र विरोधी पक्षनेत्यांसह राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले होते. त्यानंतरही तिचे काम सुरुच होते. त्यानुसार या संदर्भात महापौर मीनाक्षी शिंदे यांनीदेखील पत्र देऊन दुसऱ्या मजल्यावर शक्य नसल्यास पहिल्या मजल्यावर त्यांना कार्यालय द्यावे,अशी मागणी केली होती. त्यानंतर हा मुद्दा महासभेतही गाजला होता. अखेर पहिल्या मजल्यावर कॅबीन देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार मंगळवारी पहिल्या मजल्यावरील शिक्षण मंडळाच्या सभागृहाची पाहणी आयुक्त व विरोधी पक्षनेत्यांनी केली. यावेळी दोन ते तीन प्लॅन प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना सादर केले. परंतु,यामध्ये काही किरकोळ बदल त्यांनी सुचिवले आहेत. तसेच या कॅबीनच्या कामासाठी विलंब होणार असल्याने तळ मजल्यावरील कॅबीनचे काम लवकर पूर्ण होऊ शकते. अशी गळ पुन्हा प्रशासनाने घातली होती. परंतु, त्याला विरोधी पक्षनेत्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला. अखेर आता पहिल्या मजल्यावरच त्यांची कॅबीन असेल. (प्रतिनिधी) - पहिल्या मजल्यावर कॅबीन देण्याच्या मुद्यावर एकमत झाले. त्यानुसार मंगळवारी पहिल्या मजल्यावरील शिक्षण मंडळाच्या सभागृहाची पाहणी आयुक्त व विरोधी पक्षनेत्यांनी केली. यावेळी दोन ते तीन प्लॅन प्रशासनाने विरोधी पक्षनेत्यांना सादर केले. परंतु, यामध्ये काही किरकोळ बदल त्यांनी सुचिवले आहेत.