शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर, पालघरमध्ये फाटक, तर रायगडमध्ये मोरे यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:40 IST

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर जिंकण्यासाठी मिशन २०१९ ला शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी रायगडच्या संपर्कप्रमुखपदी अनुक्रमे अनंत तरे आणि संजय मोरे; तर पालघरच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी आमदार रवींद्र फाटक यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड जाहीर होताच नाराजीला तोंड फुटले आहे. फाटक यांना पालघरमधून कट्टर शिवसैनिकांचा विरोध सुरू झाला आहे, तर आपल्या जिल्ह्यात नवा वाटेकरी आणल्याने अनंत तरे हेही नाराज असून त्यांनी वरपर्यंत दाद मागितल्याची चर्चा आहे.त्यातही मिशन २०१९ च्या नावाखाली नेमकी जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातीलच दोन नेत्यांची वर्णी लागल्याने त्यांनी आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी ही खेळी केल्याची चर्चाही शिवसैनिकांत रंगू लागली आहे.पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार अनंत तरे यांच्याकडून पालघर जिल्हा संपर्कप्रमुख पद काढून घेत त्यांना रायगडची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापूर्वी तरे यांनी या भागातून दोन वेळा खासदारकी आणि एकावेळेला आमदारकीची निवडणूक लढवल्याने हा भाग त्यांच्या परिचयाचा असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे. पण पालघरमधील नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला जोरदार धक्का बसल्यानेच तरे यांची येथून उचलबांगडी करण्यात आल्याचे बोलले जाते. तरे यांना रायगड जिल्हाही पूर्णपणे सोपवण्यात आलेला नाही. महाड, श्रीवर्धन, पेण आणि अलिबागची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे; तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांचीही रायगड जिल्हा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे.त्यांच्याकडे कर्जत, खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दोघांकडे सोपवलेल्या परिसरात शिवसेनेचा एक-एक आमदार आहे. या दोघांची निवड करुन शिवसेनेने पुन्हा एकदा निष्ठावतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु एका जिल्हाचे दोन भाग करण्यात आल्याने त्याबाबत नाराजी आहे.मोरे हे आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावणार असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे; तर तरे यांना ठाण्यातून नव्हे तर पुन्हा रायगड जिल्ह्यातूनच शेकाप किंवा राष्ट्रवादीविरोधात आमदारकीची निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच या दोघांना एकच जिल्हा विभागून देत दोघांनाही आपली प्रतिष्ठा वाढविण्याची संधी शिवसेनेच्या श्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे विधान परिषदेचे आमदार रवींद्र फाटक यांना पालघर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखपदी नेमत पक्षाने त्यांच्यावरही विश्वास टाकला आहे. पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी त्यांची नेमणूक झाल्याची चर्चा आहे. परंतु त्यांच्या नावालाही स्थानिक नेत्यांचा विरोध सुरू झाला आहे.>ठाणे शहराकडे दुर्लक्ष?अर्थात मोरे आणि फाटक यांच्या नेमणुकीतून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत बलाढ्य नेते एकनाथ शिंदे यांनी आपला कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघ अधिक मजबूत केल्याचे मानले जाते. हे दोन्ही नेते वागळे पट्ट्यातील असल्याने त्यांच्या निवडीवरुनही पक्षात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. पालकमंत्र्यांनी केवळ आपला मतदारसंघ मजबूत करण्यासाठी या दोघांची नावे पुढे केल्याची चर्चा सुरू आहे उरलेल्या ठाणे शहरातील नेते, तेथील निष्ठावंतांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.