शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरत, सोनवणे यांच्या नियुक्तीवर आक्षेप

By admin | Updated: June 1, 2016 02:30 IST

निवडणूक आचारसंहितेचा भंग व कामात दिरंगाई केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असतानाच

कल्याण : निवडणूक आचारसंहितेचा भंग व कामात दिरंगाई केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला असतानाच आता ते आणखी एका नव्या वादात सापडले आहेत. त्यांच्यासह नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त झालेले रामनाथ सोनवणे यांच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे.याप्रकरणी कल्याणमधील दक्ष नागरिक सुलेख डोण यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात घरत आणि सोनवणे यांची नियुक्ती बेकायदा असल्याकडे लक्ष वेधत त्यांना मूळ उपायक्तपदावर आणण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे दोघांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे.लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना घेतलेल्या स्थायी समिती सभेप्रकरणी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत घरत यांची एक वार्षिक वेतनवाढ नुकतीच रवींद्रन यांनी रोखली आहे. तसेच बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात दिरंगाई केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. या घटना ताज्या असतानाच घरत यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप झाल्याने ते पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्यासह नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झालेले रामनाथ सोनवणे यांच्या निवडीवरही आक्षेप घेण्यात आला आहे.घरत व सोनवणे हे दोघेही कल्याण-डोंबिवली महापालिकेत उपायुक्तपदावर होते. परंतु त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी झालेली नियुक्ती त्या पदासाठी असलेल्या निकषात बसत नसल्याने ती बेकायदा आहे, असे याचिकाकर्ते डोण यांचे म्हणणे आहे. त्यांनी सहा महिन्यांपूर्वी सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. तेथून १२ आठवड्यात संबंधित तक्रारीवर निर्णय अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागल्याचे डोण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यात राज्य सरकार, महापालिका, संजय घरत, रामनाथ सोनवणे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह अन्य पाच जणांना प्रतिवादी केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.