शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’चे सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 00:03 IST

संडे अँकर । डहाणूत प्रशासनाची मध्यस्थी; नागरिकांची मनधरणी करून योजनेचे महत्त्व पटवले

बोर्डी : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्यात तालुक्यातील काही भागात स्थानिकांनी अंगणवाडी कर्मचाºयांना विरोध केल्याने तालुका प्रशासनाला मध्यस्थी करून समजूत काढावी लागली. त्यानंतर हा विरोध मावळल्याचे तहसीलदार राहुल सारंग यांनी सांगितले. शहरांप्रमाणेच डहाणू तालुक्यातील काही भागात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला विरोध होऊ लागला आहे. या सर्वेक्षणाकरिता अंगणवाडी कर्मचारी गृहभेटीसाठी गेले असता घोलवड, लिलकपाडा आणि अन्य पाड्यांवर स्थानिकांनी नापसंती दर्शवली. त्यानंतर कर्मचाºयांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश न आल्याने त्यांनी वरिष्ठांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर तहसीलदार राहुल सारंग, सहायक गटविकास अधिकारी राठोड आणि आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून विरोधाचे कारण समजून घेतले. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोरोना आणि या मोहिमेविषयी नकारात्मक मॅसेज पसरल्याने अफवांना पीक आले आहे.त्यामुळेच नागरिकांमध्ये विरोधी भावना निर्माण झाली आहे. कोरोनाच्या सर्व्हेक्षणासाठी शासन नागरिकांना दीड लाख रुपये देते, मात्र हा निधी शासकीय कर्मचारी वितरीत न करता स्वत: गडप करतात. त्यामुळे हा पैसा मिळायला हवा, अशी मागणी केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या या मोहिमेत सहभागी असलेले आरोग्य कर्मचारी घरोघर फिरत असल्याने त्यांच्यामार्फत हा रोग पसरण्याची भीती वाटते. तर तपासणी किटमुळेही विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता त्यांना वाटते. या वेळी कुटुंबियांच्या आजारांविषयीची माहिती द्यायला नकार दिला जातो. सर्वेक्षण करणाºया कर्मचाºयांना या प्रसंगाला रोजच सामोरे जावे लागत आहे.जनजागृती होणे आवश्यकपहिल्या टप्प्यात प्रशासनाला नागरिकांची मनधरणी करून विरोध मावळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यापक जनजागृतीची आवश्यकता भासणार आहे. त्याद्वारे योजनेचे महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणे