शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत पूर्ण झालेल्या प्रकल्प हस्तांतरणास विरोध; महापौरांसह आयुक्तांचाही आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 23:37 IST

महापौरांसह आयुक्तांचाही आक्षेप : सीईओंना दणका

ठाणे : स्मार्ट सिटीतून काही प्रकल्प पूर्ण झाले असून, ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठीचा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीत मंजुरीसाठी पटलावर आला होता, परंतु किती प्रकल्प पूर्ण झाले, त्यांची निगा देखभाल कोण करणार, काहींचे पैसे देणे शिल्लक असताना, त्यांचे दायित्व महापालिकेने का स्वीकारावे, असे प्रश्न महापौर नरेश म्हस्के यांनी या बैठकीत केले. शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव आणि महापालिका आयुक्तांनीही या प्रकल्पांची पूर्णपणे खातरजमा केल्याशिवाय ते हस्तांतरित करू नयेत, असे सुचविले. यावेळी मनमानी पद्धतीने हे प्रस्ताव आणणारे स्मार्ट सिटीचे सीईओ गणेश देशमुख यांना चांगलाच दणका बसला आहे.

स्मार्ट सिटीतील अर्बन रेस्ट रूम, डीजी ठाणे, शाळा इमारतींवर सोलार प्रकल्पांसह इतर प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठीचे प्रस्ताव पटलावर होते, परंतु हस्तांतरित करण्यापूर्वी ते पूर्ण झाले आहेत का? याच्या खातरजमेसह त्यांची निगा-देखभाल कोण करणार? मेटेनन्स कोण देणार, असेही प्रश्न करण्यात आले.  या सर्वांची सत्य परिस्थिती पाहणे महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे, डीजी ठाणे प्रकल्पाचे पैसे देणे शिल्लक आहे, परंतु त्याचे दायित्व महापालिकेने का घ्यावे, असा प्रश्नही महापौरांनी केला, तर अर्बन रेस्ट रूममधील अनेक रूम बंद आहेत, त्यांची देखभाल कोण करणार? असेही त्यांनी विचारले.  

महापौरांनी उपस्थित केलेल्या मुद्याला धरून शासनाचे प्रतिनिधी मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनीही यावर आक्षेप घेऊन हे विषय तूर्तास थांबविण्यास सांगितले. या सर्वांची पाहणी करून काही दायित्व आहे का? याची माहिती घेऊनच ते हस्तांतरित करावेत, असे या बैठकीत ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणे