शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गावदेवी मंडईतील व्यवसायांवर आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 03:31 IST

मोठा गाजावाजा करून गावदेवी भाजीमंडई ठाणे महापालिकेने सुरू करून त्याठिकाणी इतर व्यावसायिकांनादेखील संधी दिली. शिवाय, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी येथे पार्किंगची सोयसुद्धा केली.

ठाणे : मोठा गाजावाजा करून गावदेवी भाजीमंडई ठाणे महापालिकेने सुरू करून त्याठिकाणी इतर व्यावसायिकांनादेखील संधी दिली. शिवाय, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी येथे पार्किंगची सोयसुद्धा केली. परंतु, आता अटी आणि शर्तींचा भंग केल्याने तहसील कार्यालयाने ठाणे महापालिकेला नोटीस धाडली आहे. गावदेवी येथील जागा निव्वळ भाजीमंडईच्या प्रयोजनासाठी दिली असताना तेथील बहुतांश गाळे इतर व्यवसायांसाठी सुरू केले असून या ठिकाणची पार्किंगसुद्धा अनधिकृत असल्याचा ठपका तहसीलदारांनी ठेवला आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने दोन दिवसांत याचा लेखी खुलासा करावा, असेही या नोटिशीत स्पष्ट केले आहे.तहसीलदारांच्या या नोटीसमुळे गावदेवी येथील इतर गाळ्यांमध्ये सुरू केलेले व्यवसायदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गावदेवी येथील शासनाची ५५१.२८ चौरस मीटर जागा ठाणे महापालिकेने ६७ लाख २२ हजारांत महापालिकेने विकत घेतली आहे. सध्या या जागेवर १५४ गाळ्यांपैकी ११५ गाळे इतर व्यवसायांसाठी सुरू असून केवळ २९ गाळ्यांमध्ये भाजीमंडई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. खालील बाजूस पार्किंगदेखील सुरू आहे. ही जागा देताना शासनाने काही अटी-शर्ती घातल्या होत्या. त्यानुसार, ती जागा केवळ भाजीमंडईसाठी वापरावी, अशी मुख्य अट होती. मात्र, पालिकेने तिचा भंग केल्याने तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे.वापराचे प्रयोजन बदलण्यात आल्यानंतर नियमाप्रमाणे सूचना जिल्हाधिकाºयांना कळवणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेने अशी कोणतीही कल्पना जिल्हाधिकाºयांना दिली नसल्याने ही नोटीस दिली असून यामध्ये दोन दिवसांत महापालिकेला खुलासा करावा लागणार आहे. तो केला नाही तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही या नोटीसमध्ये नमूद केले आहे.भाजीमंडईसाठी ही जागा घेतली असली, तरी ज्यांनी त्याव्यतिरिक्त व्यवसाय सुरू केले आहेत, त्यांना नोटीस दिल्याचे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने आता स्पष्ट केले आहे. केवळ पार्किंगसंदर्भात त्यांना कळवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.शासनाने महापालिकेचे थकवले ९० लाखगावदेवी येथील भाजीमंडईच्या जागेत शासनाचे कौशल्य विकास केंद्र गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. ठाणे महापालिकेने ही जागा जिल्हाधिकारी कार्यालयाला भाड्याने दिली आहे.मात्र, शासनानेदेखील तीन वर्षांपासून भाड्याचे जवळपास ९० लाख भाडे थकवले आहेत. या वसुलीसाठीदेखील ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्याने दोन विभागांतील वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या