शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या तीन हजारांत घेतली होती स्फोटके!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:04 IST

मुंब्रा येथून पोलिसांनी हस्तगत केलेला स्फोटकांचा साठा आरोपींनी अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता. ही स्फोटके विकणाऱ्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.

ठाणे : मुंब्रा येथून पोलिसांनी हस्तगत केलेला स्फोटकांचा साठा आरोपींनी अवघ्या तीन हजार रुपयांमध्ये विकत घेतला होता. ही स्फोटके विकणाऱ्याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.रेल्वे सुरक्षा दल, दहशतवादविरोधी पथक आणि मुंब्रा पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये मुंब्रा-पनवेल मार्गावरील गौसिया कंपाउंडजवळच्या एका गॅरेजमधून स्फोटकांचा साठा रविवारी हस्तगत करण्यात आला. या गॅरेजचे मालक इस्माईल शेख यांना गंभीर गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी आरोपींनी गॅरेजच्या आवारातील भंगारगाडीमध्ये स्फोटके ठेवली होती. पोलिसांनी याप्रकरणी महिंसा राजेसाब गणुर उर्फ महेश, शहाआलम मेहमूद शेख आणि आरिफ नवाबअली खान यांना अटक केली असून, तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. महिंसा गणुर रेतीबंदरमध्ये मजुरी करतो. या भागात अवैध उत्खनन व्यावसायिकांच्या तो संपर्कात होता. या ओळखीतूनच त्याने डोंबिवली येथील रेतीबंदरातून १0 किलो अमोनियम नायट्रेट आणि ९ डिटोनेटर्स विकत घेतले होते. हा साठा त्याने अवघ्या तीन हजारांत विकत घेतला. त्यांच्याकडून स्फोटके विकणाºयाचा तपशील पोलिसांना मिळाला आहे. मात्र, महसूल विभागाने मध्यंतरी रेतीबंदर भागात केलेल्या कारवाईमुळे येथील अवैध उत्खननाचा गोरखधंदा तुर्तास थंडावला आहे. त्यामुळे आरोपींना स्फोटके विकणाºया व्यक्तीपर्यंत पोलीस यंत्रणा अद्याप पोहोचू शकली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.स्फोटकांची सहज उपलब्धता चिंतेचा विषयघातक स्फोटकांची सहज उपलब्धता आणि सतर्कतेच्या काळातही विनासायास होणारी वाहतूक पोलिसांसाठी नक्कीच चिंतेचा विषय आहे. स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले असताना, आरोपींनी स्फोटके डोंबिवलीतून विकत घेतली आणि त्याची मुंब्य्रापर्यंत विनासायास वाहतूकही केली, हे विशेष. घातपात घडवणे हे किती सहज शक्य आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.