शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ आगपाखड करून निवडणूक जिंकणे अशक्य’

By admin | Updated: June 27, 2017 03:06 IST

नोटबंदीचे परिणाम असो, येऊ घातलेला जीएसटी कर तसेच नुकतीच झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्यांवर पुढील काळात सरकारवर

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : नोटबंदीचे परिणाम असो, येऊ घातलेला जीएसटी कर तसेच नुकतीच झालेली शेतकऱ्यांची कर्जमाफी या मुद्यांवर पुढील काळात सरकारवर केवळ आगपाखड करून निवडणूक जिंकता येणार नाहीत, त्यासाठी आतापासूनच जनेतच्या संपर्कात राहून कामे केली पाहिजेत, असा सल्ला माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी येथील कार्यकर्ता मार्गदर्शन मेळाव्यात दिला. पश्चिमेतील सनई मंगल कार्यालयात रविवारी कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँगे्रसतर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा झाला. या वेळी नाईक बोलत होते. ते म्हणाले, सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. एकीकडे बहुमत असल्याचा दावा एनडीए करीत असलीतरी त्यांचा उमेदवार जिंकेल, याबाबत संभ्रम आहे. इंदिरा गांधीच्या सत्ताकाळात त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली होती, तर विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता, याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.नाईक यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना कानपिचक्याही दिल्या, सरकारची उणीदुणी काढून निवडणूक जिंकता येणार नाही, त्यासाठी विचारसरणी आणि कार्याची बैठक हवी. शिवसेना ही शाखांच्या माध्यमातून मोठी झाली. राष्ट्रवादीची प्रत्येक प्रभागात जनसंपर्क कार्यालये सुरू झाली पाहिजेत, मात्र ती शेठजीच्या पैशातून नव्हे तर सामान्य कार्यकर्त्यांचा बळावर उघडायला हवीत, अशा शब्दांत त्यांनी खडे बोल सुनावले. पक्षाचे काम करताना संघटन आणि चळवळ महत्त्वाची असून नवी मुंबईच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी अ‍ॅडमिशनपासून ते अ‍ॅम्ब्युलन्स सेवेपर्यंतची जनतेची सर्व कामे केली पाहिजेत, असा मोलाचा सल्लाही नाईक यांनी या वेळी दिला. निवडणूक लढवण्यासाठी लागणारा आणि सातत्याने वाढत जाणारा खर्च पाहता गोरगरीब कार्यकर्त्यांनी कशा लढवायच्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.