शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
3
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
4
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
5
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
6
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
7
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
8
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
9
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
10
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
11
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
12
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
13
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
14
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
15
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
16
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
17
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
18
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
19
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
20
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

एकच गजर... हॅपी न्यू ईयर...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 07:14 IST

ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवार उजाडला तोच मुळी सरत्या वर्षाला निरोप देण्याचा उत्साह घेऊन. सलग आलेल्या सुट्या, आठवडाअखेर, महिनाअखेर आणि वर्षअखेरीचे निमित्त साधत आळसावलेल्या सकाळपासून दिवस चढत गेला आणि उत्साहही. ठाणे असो की डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर अगदी मुरबाड-शहापूरमधील फार्महाऊसेस सगळीकडे गर्दी वाढत गेली. सरत्या वर्षातला सूर्य संध्याकाळी मावळला आणि हॉटेल, पब, इमारतीच्या गच्चीवर, मैदानात आणि नंतरनंतर तर चक्क रस्त्यावर गर्दी होत गेली. रात्री बाराच्या ठोक्याला सर्वत्र एकच उत्साह संचारला. एकच जल्लोष झाला... हॅप्पी न्यू इयरचा!ठाणेकरांवर रविवारी सायंकाळीच सेलिब्रेशनची झिंग पाहायला मिळाली. सरत्या वर्षाला निरोप देतानाच, गाड्यांचे वाजलेले हॉर्न. चर्चमधील घंटानाद, फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत ठाणेकरांनी आनंदाने नववर्षाचे स्वागत केले. सोशल मीडियावर तर नववर्ष शुभेच्छांच्या मेसेजेस्चा अक्षरश: खच पडला.तलावपाळी, उपवनसह शॉपिंग मॉलमध्ये झालेली गर्दी, रंगलेल्या डिनर पार्ट्या, हॉटेल्स्-रेस्टॉरंटबाहेर लागलेल्या रांगा, अनेक सोसायट्यांमध्ये रंगलेले सांस्कृतिक कार्यक्रम, गेम्स्, पार्ट्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाई आणि रस्त्यावर बाईक रायडर्सची वाढलेली वर्दळ असे उत्साही वातावरण ठाण्यात पाहायला मिळाले ते नववर्षाच्या पूर्वसंध्येला. अनेकांनी कुटुंबासोबत तर कोणी मित्रांच्या ग्रुपसोबत शनिवारीच सेलिब्रेशन डेस्टिनेशन गाठले होते. त्यामुळे फार्म हाऊस, पिकनिक स्पॉट शनिवारपासूनच फुल्ल होते. ३१ डिसेंबरचा सूर्य अस्ताला जात असतानाच म्हणजेच रविवारी सायंकाळपासून खºया अर्थाने सेलिब्रेशनला सुरूवात झाली. हे सेलिब्रेशन पहाटेपर्यंत सुरू होते. काही सोसायच्यांच्या आवारात महिला, ज्येष्ठांचे स्वतंत्र कार्यक्रम रंगले होते. त्यामुळे नववर्ष स्वागताचा उत्साह हा बच्चे कंपनीपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत दिसून आला. खाऊ गल्ल्या, फूड कॉर्नर आणि हॉटेल्स् सायंकाळपासूनच गर्दीने फुल्ल झाले होते. यंदा थर्टीफर्स्ट आणि रविवार असा योग जुळून आल्याने नॉनव्हेजवर खवय्यांनी ताव मारला होता. त्यामुळे त्यांच्या हॉटेल्ससह आईस्क्रीम पार्लरमध्ये डिलिव्हरीसाठी बराचवेळ थांबून रहावे लागत होते.सोशल मीडियावर पडला मेसेजेसचा खचसेकंदासेकंदाला अपडेट असणा-या नेटक-यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून परस्परांना मेसेजेस् पाठवित नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी सायंकाळपासूनच या मेसेजस्च्या देवाणघेवाणीला सुरूवात झाली होती.रात्री १२ च्या ठोक्याला तर या मेसेजेस् आणि पोस्टचा अक्षरश: खच पडला. इतके की नेटवर्क जाम झाले. आठवणी, आभार मानणारे मेसेजेस् व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकवर झटपट पोस्ट होत होते. जीफ फाइलनेही रंगत आणली.रंगल्या शेकोटी पार्र्ट्याठाणे जिल्ह्यातील गारेगार वातावरणात ऊब आणली ती शेकोटी पार्ट्यांनी. नाच-गाणी, सोबत खाणे-पिणे आणि शेकोटीची ऊब असा मस्त माहोल रंगला होता.

टॅग्स :thaneठाणे