शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठाण्यात फक्त ५२९ खड्डे

By admin | Updated: July 6, 2016 02:38 IST

कापूरबावडी आणि घोडबंदरच्या सर्व्हीस रोडवर खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, या वृत्ताची दखल घेऊन एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेने खड्डे बुजविण्यास

ठाणे : कापूरबावडी आणि घोडबंदरच्या सर्व्हीस रोडवर खड्डे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, या वृत्ताची दखल घेऊन एमएसआरडीसी आणि ठाणे महापालिकेने खड्डे बुजविण्यास युद्ध पातळीवर सुरुवात केली आहे. ते बुजविण्यासाठी जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. परंतु, ठाण्यात यंदा रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा महापालिकेचा दावा मात्र पुरता फोल ठरला आहे.ठाणे महापालिकेच्या स्टार ग्रेड या अ‍ॅपवर ५ जुलैपर्यंत ७०२ तक्रारी आल्या असून त्यातील ५२९ तक्रारी या खड्डयांच्या असल्याची माहिती समोर आली आहे.पावसाने जोर धरल्याने शहराच्या विविध भागात त्यातही कापूरबावडी उड्डाणपुलावर आणि घोडबंदरच्या सर्व्हिस रोडवर खडडे पडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या ठाणे महापालिकेने ते बुजविण्याची कारवाई सुरु केली आहे. ते बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीसाठी यापूर्वीच प्रत्येकी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता ते बुजविण्याचे काम जेट पॅचर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरु केले आहे. या तंत्रज्ञानात कोल्ड मिक्सचा वापर केला जात असून पालिका प्रथमच अशा तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे अवघ्या एक तासाच्या आतच रस्ता हा वाहतुकीसाठी खुला होत आहे. दरम्यान ठाणे महापालिका हद्दीत यंदा पावसाळ्यात खड्डे नसतील, असा जो दावा पालिकेने केला होता. तो दावा मात्र पावसाने फोल ठरविला आहे. तिनहात नाका, नितिन कंपनी, कापूरबावडी, कळवानाका, कॅसलमील, टेंभीनाका आदींसह महापालिकेच्या १० प्रभाग समितीमध्ये रस्त्यांना खड्डे पडल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिकेने सुरु केलेल्या, स्टार ग्रेड या अ‍ॅपवर ५ जुलैपर्यंत, ७०२ तक्रारी आल्या असून यामध्ये फेक तक्रारी १०० असून, चुकीच्या आणि इतर स्वरुपाच्या ७३ तक्रारी वगळता एकूण ५२९ तक्रारी या खड्यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ शहरात १० प्रभाग समितीअंतर्गत हे खड्डे पडले आहेत. यातूनच पालिकेचा दावा फोल ठरल्याचेच उघड होत आहे. काही ठिकाणी जरी जेट पॅचरचा वापर केला जात असला तरी घोडबंदरच्या सर्व्हिस रोडवर खडी टाकून तात्पुरता मुलामा दिला जात आहे. तर कापूरबावडी उड्डाणपुलावर पेव्हर ब्लॉकचा वापर केला जात आहे. त्यामुळे येथे पुन्हा खड्डे पडणार हे यातून स्पष्ट होत आहे.रायलादेवी, वागळेही खड्ड्यांनी भरलेलेठाणे महापालिका हद्दीतील १० प्रभाग समितीमधील नौपाडा या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्राईम लोकशनच्या समितीत खडड््यांच्या तब्बल १०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या खालोखाल रायलादेवीमध्ये ७९, वागळे ६५, लोकमान्यनगर सावरकरनगर ६२, माजिवडा-मानपाडामध्ये ४९ तक्रारी अ‍ॅपवर आल्या आहेत. खड्डयांमुळे ट्रफिक ब्लॉकशहराच्या विविध भागात खड्डे पडल्याने तिनहातनाका, नितिन कंपनी, कॅसलमील, टेंभीनाका, विटावा आदींसह शहराच्या इतर भागातही खडड््यांचा त्रास वाहन चालकांना होत असून यामुळे ठिकठिकाणची वाहतूक सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेस ब्लॉक होत आहे.