शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

ठाणे शहरात अवघे २० टक्केच बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:40 IST

ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ठामपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या चार ते ...

ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ठामपाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत; परंतु मागील काही दिवसांत रुग्णांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. त्यामुळे शहरातील कोविड सेंटरमध्ये आता बेडची संख्याही कमी होत आहे. ठामपा हद्दीत सध्या १२,९८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ८० टक्के रुग्ण घरी उपचार घेत असले तरीही रुग्णालयांतील ८० टक्के बेड भरलेले आहेत, तर खासगी रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातही आता जोखमीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आयसीयूचे आठ टक्केच बेड शिल्लक आहेत.

ठामपा हद्दीत दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळत आहेत. सध्या १२,९८३ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील ३२९४ रुग्ण हे विविध रुग्णालयांत दाखल आहेत, तर यातील ९२८१ रुग्ण हे घरीच विलगीकरणात आहेत. एकूण रुग्णांतील ९७४६ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत, तर २७०९ रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. ५२८ रुग्ण अत्यवस्थ असून, ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, तर ५७ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे एकूण ४१२२ बेडपैकी ३२९४ बेड फुल्ल झाले आहेत. केवळ ८२८ बेड विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत. त्यानुसार शहरात सध्या केवळ २० टक्केच बेड शिल्लक आहेत.

ठामपाच्या ग्लोबल कोविड सेंटरमधील बेड फुल्ल झाले आहेत. त्यामुळे मनपाला आता ज्युपिटर येथील दुसऱ्या कोविड सेंटरकडे मोर्चा वळवावा लागला आहे. तेथे ४०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातही सर्वसाधारण ११९४ बेडपैकी ६३९ बेड भरलेले असून, ५५५ बेड शिल्लक आहेत, तर ऑक्सिजनचे २३५७ बेडपैकी २०७० बेड फुल्ल असून, २८७ बेड शिल्लक आहेत. याचाच अर्थ ऑक्सिजनचे १२ टक्केच बेड शिल्लक आहेत, तर आयसीयूचे ५७१ पैकी ५२८ बेड भरलेले असून, आता केवळ आठ टक्केच बेड शिल्लक आहेत. व्हेंटिलेटरचे २२६ पैकी ५७ बेड भरलेले असून, १६९ बेड शिल्लक आहेत.

ठामपा करतेय २५०० बेडची व्यवस्था

- ठामपाकडून आणखी २५०० बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र, तोपर्यंत रुग्णांना बेडसाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे शर्तीचे प्रयत्न सुरू असतात. परंतु, तेथे बेड मिळणे कठीण झाले आहे.

- ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील बेडही १०० टक्के फुल्ल झाल्याने रुग्णांना बेड मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यातही रुग्ण दिवसागणिक वाढत असल्याने दोन दिवसांत शिल्लक बेडही फुल्ल होतील, असे सांगितले जात आहे. त्यानंतर मात्र काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

--------------