शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी आॅनलाइन परवानगी, शांतता समिती सदस्यांची बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:51 IST

गणेशभक्तांच्या सोयीसाठी या वेळी पोलीस आयुक्तालयाने आॅनलाइन अर्जाची तरतूद केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत ही माहिती दिली.

ठाणे : गणेशभक्तांच्या सोयीसाठी या वेळी पोलीस आयुक्तालयाने आॅनलाइन अर्जाची तरतूद केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी शांतता समिती सदस्यांच्या संवाद बैठकीत ही माहिती दिली. सर्व नियमांचे पालन करून डीजेरहित उत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी या वेळी केले.गणेशोत्सव आणि दहीहंडीनिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शांतता समितीच्या सदस्यांसाठी संवाद बैठकीचे आयोजन शुक्रवारी टीपटॉप प्लाझा येथे केले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा, कल्याण, भिवंडी आदी शहरांमधील खराब रस्ते आणि वाहतुकीचे प्रश्न सदस्यांनी प्रकर्षाने मांडले. सदस्यांच्या सर्व सूचनांची नोंद पोलीस अधिकाºयांनी या वेळी घेतली. गणेश उत्सवादरम्यान मंडप उभारण्याबाबत काही नियम आहेत. त्याची माहिती देऊन या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले. दहीहंडीसंदर्भातही उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांच्या प्रती शांतता समिती सदस्यांना दिल्या जाणार असून त्याचे पालन मंडळांकडून होत असल्याची खात्री करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले. दहीहंडी हा साहसी खेळ आहे. त्यामुळे साहसी खेळासाठी असलेले नियम या उत्सवालाही लागू होत असल्याचे सहपोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.डीजेचा वापर न करणाºया मंडळांसाठी उल्हासनगर महापालिकेने २ हजार रुपये बक्षिसाची घोषणा केली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. उत्सवाच्या काळात सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जातात. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नही केले जातात. अशा संदेशांकडे दुर्लक्ष करून ते पोलिसांच्या लक्षात आणून देण्याचे आवाहन या वेळी अधिकाºयांनी केले. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनजागरूकता निर्माण करणाºया काही चित्रफितींचे प्रसारण या वेळी वरिष्ठ अधिकाºयांच्या हस्ते करण्यात आले. या चित्रफिती सोशल मीडियाच्या आधारे मोठ्या प्रमाणात प्रसारित केल्या जाणार असून चित्रपटगृहांमध्येही दाखवल्या जाणार आहेत.