शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालय पोहोचविणार आॅनलाईन शॉपिंगच्या वस्तू घरपोच

By admin | Updated: April 11, 2017 02:50 IST

आॅनलाईन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन टपाल कार्यालयानेदेखील आता यामध्ये उडी घेतली आहे. अशा आॅनलाईनच्या पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर

ठाणे : आॅनलाईन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन टपाल कार्यालयानेदेखील आता यामध्ये उडी घेतली आहे. अशा आॅनलाईनच्या पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर आता ठाणे टपाल कार्यालयानेदेखील पुढाकार घेतला असून ही सेवा सोमवारपासून ठाण्याच्या मुख्य टपाल कार्यालयात सुरु झाली आहे. यासाठी ठाणे टपाल कार्यालय इ कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांशी संलग्न झाले असून यासाठी दोन विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे कार्यालयात येणाऱ्या स्पीड पोस्टचे प्रमाण जास्त आहेच, मात्र, आॅनलाईनने येणाऱ्या पार्सलचे प्रमाणदेखील जास्त असल्याने भविष्यात ही सेवा अधिक व्यापक स्वरुपात करणार असल्याची माहिती वरिष्ठ डाकपाल वाय. एन. मोहम्मद यांनी दिली. या सेवांमुळे पोस्टमनचा भार काम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष खरेदीसाठी कोणालाही वेळ नसल्याने आॅनलाईन शॉपिंगचा ट्रेंड मागील काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इ कॉमर्स उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यात येणाऱ्या पार्सलच्या वितरणासाठी यापूर्वीच भारतीय टपाल खात्याने पुढाकार घेतला असून मुंबईमध्ये ३५ वाहनांच्या माध्यमातून १३ वितरण केंद्रे केवळ अशा प्रकारच्या इ कॉमर्सच्या वितरणासाठी सुरु करण्यात आली आहे. मुंबई नंतर आता ठाणे मुख्य टपाल कार्यालयामध्ये ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई आणि भांडुप या ठिकाणी ही सेवा सुरु केली आहे. ठाणे मुख्य टपाल कार्यालयाअंतर्गत संपूर्ण ठाणे शहर तसेच कळवा मुंब्रा आणि मुंब्य्राच्या आसपासची छोटी खेडीदेखील येतात. या कार्यालयात इ कॉमर्सच्या मध्यमाध्यमातून दररोज पार्सल येण्याचे प्रमाण हे १०० ते १२५ पर्यंत आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असल्याने ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ठाणे टपाल कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या वितरणासाठी सध्या दोन गाड्यांची सुविधा असून यासाठी ४ पोस्टमनची नियुक्ती केली आहे. पार्सल आल्यापासून केवळ सहा तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पार्सल पोहचणार असल्याचा दावा टपाल कार्यालयाने केला आहे. यासाठी पोस्टाने अशा आॅनलाइन कंपन्यांशी टायअपही केल्याचे कार्यालयाने सांगितले. (प्रतिनिधी)आॅनलाइन कंपन्यांशी केले टायअपआॅनलाईन शॉपिंगचा ट्रेंड काही वर्षांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इ कॉमर्स उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. आॅनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यात येणाऱ्या पार्सलच्या वितरणासाठी यापूर्वीच भारतीय टपाल खात्याने पुढाकार घेतला असून मुंबईमध्ये ३५ वाहनांच्या माध्यमातून १३ वितरण केंद्रे केवळ अशा प्रकारच्या इ कॉमर्सच्या वितरणासाठी सुरु करण्यात आली आहे. इ कॉमर्समध्ये आघाडीवर असणाऱ्या अ‍ॅमेझॉन , मिंत्रा , स्नॅपडील, अशा कंपन्याशी टायअप केले असून मुंब्य्रामधील छोट्याछोट्या भागांमध्ये ही सेवा जाणार असल्याचे टपाल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.