शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे गरब्याचे ऑनलाइन धडे;  वर्क फ्रॉम होममुळे महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 23:23 IST

संडे अँकर । ‘टिमली’ गरबा प्रकाराचे प्रशिक्षण

ठाणे : यंदा नवरात्रोत्सवात कोरोनामुळे गरबा होणार नसल्याने दरवर्षी गरबा खेळणारे यंदा आॅनलाइन गरबा शिकत आहेत. विशेषत: यात महिलांचा अधिक सहभाग असून वर्क फ्रॉम होममुळे त्यांना गरबा शिकण्याची नवीन संधी मिळाली असल्याच्या भावना व्यक्त होत आहे. यंदा गुजरातच्या मातीतला टिमली हा गरबा प्रकार नव्याने शिकवला जात आहे.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात गरबा रंगणार नसल्याने गरबाप्रेमी आॅनलाइन गरबा शिकत आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळत नवरात्रोत्सव साजरा करण्याचे महापालिकेने सर्व सार्वजनिक मंडळांना आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा या उत्सवानिमित्ताने दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या गरब्याला ब्रेक लागणार आहे.

गरबा प्रशिक्षक वैशाली सत्रा या गरबाप्रेमींना गरब्याचे विविध प्रकार शिकवत आहेत. केवळ ठाण्यातील नव्हे तर मुंबई, पुणे, गोवा, राजस्थान, औरंगाबाद येथील गरबाप्रेमीही आॅनलाइन गरब्याचे धडे गिरवत आहेत. कोरोनाकाळातही गरब्याची आवड जोपासली जात आहे. त्यामुळे गरब्याला परवानगी नसल्याने हे गरबाप्रेमी बाहेर गरबा खेळायला जाणार नसले, तरी घरातल्या घरात कुटुंबासोबत खेळणार असल्याने ते शिकत असल्याचे सत्रा यांनी सांगितले. आॅनलाइन गरब्यामध्ये २५ ते ५५ वयोगटांतील महिला सहभागी झाल्या आहेत.दोडियो, पोपट, पॉवर गरब्याच्याही स्टेप्सदरवर्षी गरब्यात नवीन गरबा प्रकार किंवा एखाद्या फिल्मी गाण्यावर गरबा शिकविला जातो. यंदा नवरात्रौत्सवात मैदानात गरबा खेळला जाणार नसला, तरी घरातल्या घरात गरबा खेळणाऱ्यांना ‘टिमली’ हा गुजरातचा मूळ गरबा शिकविला जात आहे. यात हातांच्या हालचाली कमी असून पायांच्या हालचाली जास्त आहेत. त्यामुळे एक प्रकारे व्यायामही होत असल्याचे सत्रा यांनी सांगितले. दोडियो, पोपट, तीनताली, दोताली, हिच हुडो याप्रमाणे पॉवर गरबाही शिकविला जात आहे.

टॅग्स :garbaगरबा