शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दर चार मिनिटांमध्ये अपघातात एकाचा बळी ही चिंतेची बाब - एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : दरवर्षी दीड लाखांहून अधिक बळी रस्ते अपघातात जातात आणि सहा लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. दर चार मिनिटाला अपघातात एक बळी जातो, ही चिंतेची बाब असून दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या संपूर्ण विकासाच्या माध्यमातून रस्ते अपघातांचे प्रमाण अत्यल्प करण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात केले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा अभियान २०२१ या महिनाभर सुरू असलेल्या मोहिमेचा समारोप बुधवारी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ठाणे शहर आणि परिसरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार, कोपरी-पटणी खाडी पूल, कोलशेत-गायमुख कोस्टल रोड, आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड रोड, कोपरी पूल रुंदीकरण अशा अनेक प्रकल्पांमुळे वाहतूककोंडीची समस्या सुटायला मदत होणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण कमी होईल आणि अपघातांची संख्या कमी होण्यासही मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

* सिग्नल यंत्रणेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तीन कोटी, तसेच ठाणे ते कसारा या मार्गावर सीसीटीव्ही यंत्रणेसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

* कोरोना काळातही पोलिसांनी जीव धोक्यात घालून काम केले. कम्युनिटी किचन सुरू व्हायच्या आधी पोलिसांनी गोरगरिबांना अन्न द्यायला सुरुवात केली होती. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रक्तदान केले. त्यामुळे पोलिसांसाठी आपण जेवढे करू, तेवढे कमीच आहे, असे गौरवोद्गार काढत शिंदे यांनी सिडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांमध्ये पोलिसांसाठी खास कोटा ठेवला असल्याचेही सांगितले.

* आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, वाहतूक हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळेच वाहतूक पोलिसांचे काम आव्हानात्मक असते. शहरीकरणामुळे, वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. कोरोनासारख्या संकटाच्या काळातही पोलीस मागे हटले नाहीत, असे ते म्हणाले. कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

* ऑनलाइन माध्यमातून रस्ते सुरक्षेविषयक लघुपट, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या विजेत्यांना शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, वाहतूक पोलिसांचे कार्य व रस्ते सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या लघुनाटिका व नृत्यसंगीत कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. अभिनेते प्रसाद खांडेकर व पंढरीनाथ कांबळे यांच्या सादरीकरणालाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी सहआयुक्त सुरेश मेकला तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि या मोहिमेचे ब्रँड ॲम्बॅसेडर मंगेश देसाई आदी उपस्थित होते.