शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

तीनपैकी एक पूल वाहतुकीसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:46 IST

ठाणे शहरात तीन उड्डाणपूल जवळपास बांधून तयार आहेत, मात्र अगोदर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नेते व्यस्त असल्याने व आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांचे औपचारिक उद्घाटन लांबणीवर पडले आहे.

ठाणे : ठाणे शहरात तीन उड्डाणपूल जवळपास बांधून तयार आहेत, मात्र अगोदर पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत नेते व्यस्त असल्याने व आता कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाल्याने त्यांचे औपचारिक उद्घाटन लांबणीवर पडले आहे. मात्र दुचाकीचालकांनी चोरीछुपे त्यापैकी एका पुलावरून वाहतूक सुरू आहे.मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोलपंप, नौपाडा टेलिफोन एक्स्चेंज या तीन उड्डाणपुलांपैकी तीन पेट्रोलपंप म्हणजेच वंदना ते मखमली तलावपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरून दुचाकींची ये-जा सुरू झाली आहे. परंतु, उर्वरित दोन पुलांचे काम काहीअंशी शिल्लक आहे.हे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २४ डिसेंबर २००७ रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार, हे काम एमएसआरडीसीमार्फत करण्यात येणार होते. परंतु, या तीन उड्डाणपुलांचा खर्च अधिक असल्याने एमएसआरडीसीने ते करण्यास नकार दिला. त्यानंतर, एमएमआरडीएने या उड्डाणपुलांमध्ये बदल सुचवून पुन्हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, तत्कालीन आयुक्त आर.ए. राजीव यांच्या कार्यकाळात या तीन उड्डाणपुलांऐवजी येथे एकच तीन किमीचा उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. याचा प्रस्तावही तयार झाला. परंतु, पूर्वीच्या खर्चापेक्षा या एका उड्डाणपुलाचा खर्च हा दुप्पट झाल्याने एमएमआरडीएने निधी देण्यास नकार दिला. त्यात पालिकेच्या तिजोरीतही तेवढी रक्कम नसल्याने हा प्रस्ताव कागदावरच राहिला. परंतु, भविष्यात येथील वाहतूककोंडी लक्षात घेता, या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त झाल्यानंतर पुन्हा पालिकेने पुन्हा तीन उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावानुसार काँक्रिटऐवजी स्टीलचे डिझाइन तयार केले. म्हणजेच या उड्डाणपुलांचे प्रत्येक गर्डर हे स्टीलमध्ये तयार केले जाणार होते. परंतु, याचाही खर्च अवास्तव होत असल्याने आम्ही सुमारे २०० कोटीपर्यंतचा निधी देऊन त्यावरील सर्व खर्च पालिकेने करावा, असे प्राधिकरणाने पालिकेला कळवले. तसेच प्लॅनमध्ये काही बदलही सुचवले होते. आता हे पूल पूर्णत्त्वाला जाण्याच्या मार्गावर असून, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.