शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार शिधावाटप अधिकारी- कर्मचारी कोरोना लसीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:40 IST

ठाणे : सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्यात मुंबई, ठाणे जिल्ह्यांत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे ...

ठाणे : सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्यात मुंबई, ठाणे जिल्ह्यांत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरीपुरवठा विभागांतर्गत येणाऱ्या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरीपुरवठा यांचे आस्थापनेवरील कर्मचारी, अधिकारी बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल, अशा अनेक दूरवरच्या ठिकाणांवरून प्रवास करणारे चार हजार २२३ शिधावाटप दुकानांवरील एक हजार ५० अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या लसीकरणपासून वंचित असल्याचा आरोप मुंबई शिधावाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले व सरचिटणीस विनायक निकम यांनी केला आहे.

कोरोनाच्या या महामारीत सातत्याने हे अधिकारी, कर्मचारी प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरातील जनतेपर्यंत चार हजार २२३ शिधावाटप दुकानांमार्फत अन्नधान्याचा पुरवठा करीत आहेत. या सर्व शहरांना कोरोना विषाणूचा विळखा पडलेला असताना ते जीव मुठीत घेऊन जनतेपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे कर्तव्य प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून पार पाडत आहेत. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात अपुरे मनुष्यबळ असतानाही काम करणारे हे कर्मचारी, अधिकारी अद्याप लसीकरणापासून वंचित असल्याचे भोसले म्हणाले.

-अपुऱ्या मनुष्यबळात चोख सेवा

शिधावाटप यंत्रणेत सहायक नियंत्रक शिधावाटपची सात पदे मंजूर असून, ती गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहेत. शिधावाटप अधिकारी हे कार्यालयप्रमुख पदांमधील ६० पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत, तर सहायक शिधावाटप अधिकाऱ्यांची १६ पदे रिक्त आहेत. शिधावाटप यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या शिधावाटप निरीक्षकांची २५३ इतकी पदे रिक्त आहेत व इतर कर्मचाऱ्यांची ४४८ पदे रिक्त आहेत. संपूर्ण शिधावाटप यंत्रणेत एक हजार ८९० पदांपैकी ७५१ एव्हढी पदे रिक्त आहेत. शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही अद्याप रिक्त पदे भरलेली नाहीत.

-अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम थांबवा

-- कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना अपात्र शिधापत्रिका शोधमोहीमदेखील कर्मचारी/ अधिकाऱ्यांच्या माथी मारली जात आहे. तूर्तास या अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.