शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
3
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
4
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
5
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
6
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
7
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
8
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
9
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
10
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
11
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
12
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
13
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
14
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
15
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
16
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
17
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
18
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
19
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
20
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल

ठाण्यात एक हजार परवडणारी घरे

By admin | Updated: March 25, 2017 01:24 IST

ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेने ठाणेकरांसाठी परवडणाऱ्या एक हजार घरांची योजना प्रत्यक्षात उतरवण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांत पंतप्रधान आवास योजनेला गती देण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यानंतर, पुढील तीन महिन्यांत योजनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका या योजनेसाठी प्रभागनिहाय सर्वेक्षण करणार असून इच्छुकांचे आॅफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे. वर्षभरात किमान एक हजार घरे बांधण्याचे उद्दिष्ट निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले. ठाण्यात सर्वसामान्यांना घरे घेणे अशक्य झाले आहे. घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत प्रकल्पग्रस्त, झोपडीधारकांना प्राधान्यांनी घरे देण्यात येतात. प्रशासनाने किमान दोन लाख परवडणारी घरे बांधण्याचा निश्चय केला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. उपलब्ध भूखंड, त्यावर किती इमारती व घरे बांधता येऊ शकतात, या योजनेत कोणाकोणाला सामावून घेता येऊ शकते आदी सर्व बाबींचा आराखडा तीन महिन्यांत सल्लागारांकरवी तयार केला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सुमारे ५५० चौरस फूट बिल्टअप एरिया असलेली घरे उपलब्ध होणार आहेत. ठाणे महापालिका विकासकाला भूखंड देणार असून मागणीनुसार त्यांना घरे उपलब्ध करून द्यायची आहेत. जागा विनामूल्य मिळणार असल्याने केवळ बांधकाम खर्च विकासकाला करावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच घरांच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असणार आहेत. साधारण सहा लाखांपासून हा बांधकाम खर्च येणार असून सर्व व्यवहार बँकांमार्फत होणार आहेत. ठाण्यात घर घेण्यासाठी जानेवारी २०१७ पर्यंत ७ हजार अर्ज आॅनलाइन ‘म्हाडा’च्या वेबसाइटवर आले आहेत. एप्रिलनंतर पुन्हा नोंदणी सुरू होणार आहे. मात्र, ही योजना जास्तीतजास्त ठाणेकरांपर्यंत पोहोचावी व जास्तीतजास्त ठाणेकरांना हक्काचे परवडणारे घर मिळावे, यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे. आॅफलाइन नोंदणी करून अर्जही स्वीकारण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता अनिल पाटील यांनी सांगितले.प्रशासनाने बेतावडे, म्हातार्डी येथे सुमारे १ हजार घरे बांधण्याचे निश्चित केले आहे. महासभेने त्याला आधीच मंजुरी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. (प्रतिनिधी)