शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

भाईंदरमध्ये इमारतीचा सज्जा पडून एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:45 IST

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या विमल डेरी मार्गावरील आनंदनगर ए या इमारतीचा सज्जा कोसळून एक जण जखमी झाला आहे. ...

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या विमल डेरी मार्गावरील आनंदनगर ए या इमारतीचा सज्जा कोसळून एक जण जखमी झाला आहे. महापालिकेने ही इमारत रिकामी करण्यास घेतली असून, रहिवाशांना क्रीडा संकुलासमोरील सदनिकांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे.

आनंदनगर ए ही इमारत जुनी असून, रविवारी सकाळी १०च्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला. यावेळी खाली असलेल्या मनोहर काशीलाल जैन (५५) यांच्यावर सज्जा कोसळल्याने ते जखमी झाले. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, आमदार गीता जैन, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, स्थानिक नगरसेविका तारा घरत, स्नेहा पांडे, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांच्यासह पूजा आमगावकर, पवन घरत आदींनी घटनास्थळी पाहणी केली. इमारत जुनी असल्याने पुन्हा कोणती दुर्घटना होऊन जीवितहानी घडू नये, याकरता अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर इमारत रिकामी करायला घेतली.

दरम्यान, महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन, शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्याची मागणी केली. पालिका क्रीडा संकुलासमोरील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिका महिनाभरासाठी रहिवाशांना राहण्यास उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रवीण पाटील म्हणाले.