शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एक व्यक्ती तीन पदांमुळे सेनेत नाराजी, मोरे यांची पत्नी महापौरपदाच्या स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 03:46 IST

डोंबिवली : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असतानाही भाजपाकडून तोंडाला काळे फासले जात असताना तो विषय हसण्यावर नेणारे भाऊ चौधरी यांना थोड्या काळानंतर हटवण्यात आले असले, तरी ज्या राजेश मोरे यांच्याकडे ादीच दोन महत्त्वाची पदे होती

डोंबिवली : शिवसेनेच्या शहरप्रमुखपदावर असतानाही भाजपाकडून तोंडाला काळे फासले जात असताना तो विषय हसण्यावर नेणारे भाऊ चौधरी यांना थोड्या काळानंतर हटवण्यात आले असले, तरी ज्या राजेश मोरे यांच्याकडे ादीच दोन महत्त्वाची पदे होती, त्यांना तिसरे पद दिल्याने शिवसेनेतील नाराजी बाहेर आली आहे. त्यातच पुढील वर्षी होणा-या महापौरपदाच्या निवडणुकीत मोरे यांच्या पत्नी भारती यांचे नाव प्रमुख दावेदारांत गेतले जात असल्याने आता त्यांना चौथे पदही मिळणार म्हणूनही अस्वस्थता आहे.पक्षात बाहेरून आलेल्यांवर पदांची खैरात केली जात असल्याने निष्ठावंत म्हणून काय सभेत फक्त गौरव करून घ्यायचा का, असा प्रश्न कट्टर शिवसैनिक करत आहेत. त्यामुळे खांदेपालट करताना नव्याने उफाळून आलेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांना पार पाडावे लागणार आहे.राजेश मोरे हे आधी राष्ट्रवादीत होते. त्यांचे राजकीय गुरु पुंडलिक म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. शिवसेनेची वाट धरली. त्यांना उप जिल्हाप्रमुखपद दिले. त्यांचा मुलगा दीपेश यांना दोन वेळा नगरसेवकपद मिळाले. दीपेश यांना पक्षाने युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली. स्थायी समितीचे सभापतीपद दिले. ते महापौरपदासाठी प्रयत्नशील आहेत. म्हात्रे यांच्या गटाचे कट्टर समर्थक असलेले मोरे आणि त्यांची पत्नी भारती निवडून आले आहेत. पालिकेत सभागृह नेतेपद कोणी घेऊ इच्छीत नव्हते, तेव्हा मोरे यांनी ते पद स्वीकारले, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. पुढे स्थायी समितीचे सदस्यपदही मोरे यांना मिळाले. आता डोंबिवली शिवसेना शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांना सोपवली आहे. मोरे यांंच्या पत्नी भारती यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत आहे. त्यांना महापौरपद मिळाले, तर पदांचा आकडा चारवर जाऊ शकतो. त्यामुळेच पक्षात खदखद आहे.>...म्हणे तारीख चुकीची पडली!मोरे यांना शहर प्रमुखपदाचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर मे महिन्याची तारीख आहे. त्यामुळे तेव्हाच चौधरी यांना हटवून मोरे यांना पद देण्याचे ठरले होते, फक्त त्याची अंमलबजावणी आता झाल्याची चर्चा आहे. त्यावर तारीख चुकीची पडल्याचा खुलासा शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे. शहरप्रमुखपद दिल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर असल्याबद्दल छेडले असता, मोरे यांनी मी पद मागायला गेलो नव्हतो. पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, ती योग्य प्रकारे चोखपणे पार पाडणार. त्यामुळे नाराजीचा प्रश्न येतच नाही, अशी भूमिका घेतली आहे. कोकणवासीयांच्या नाराजीबद्दल बोलताना मोरे यांच्या समर्थकांनी यापूर्वी कोकणाला शहरप्रमुखपद दिले तरी त्यांना साधे नगरसेवकपद मिळवता आले नाही, असा टोला चौधरी यांना लगावला. त्यामुळेच आगरी समाजाला पद दिल्याचा त्यांचा दावा आहे. भाऊ चौधरी यांना पदावरुन हटविले नसून त्यांनी स्वत:हून प्हे पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, असेही स्पष्टीकरण नव्या गटातर्फे देण्यात येत आहे. पक्षातील या नाराजीवर मात करण्याचे आव्हान मोरे यांच्यासमोर आहे.>कोकणावर अन्याय करत आगरी समाजाला झुकते मापडोंबिवलीत कोकणातून आलेल्यांची संख्या मोठी आहे आणि कोकण हा शिवसेनेचा हुकमी एक्का मानला जातो. शहर प्रमुखपदाच्या स्पर्धेतून आता कोकण बाद झाले असून त्याची जागा आगरी कार्डाने घेतली आहे. भाजपाने मात्र कोकणाचा चेहरा जपला आहे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे कोकणातील आहेत. त्याचबरोबर नंदू परब हेही कोकणातील आहेत. पुंडलिक म्हात्रे गटाविरोधात शिवसेनेचा एक गट आहे. त्या गटाला मोरे यांना शहरप्रमुखपद देणे रुचलेले नाही. त्या गटाची नाराजी सध्या उघडपणे दिसून येत नसली, तरी ही नाराजी योग्यवेळी, योग्य व्यासपीठावर व्यक्त करण्याची त्यांची परंपरा आहे. यात डोंबिवलीच्या राजकारणात पक्षीय मतभेद विसरून एकत्र येणारे आगरी कार्ड मात्र खुशीत आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका