शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर

By अजित मांडके | Updated: September 5, 2022 16:42 IST

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. मृतांची संख्या पोहचली १५ वर

अजित मांडके

ठाणे : कोरोनापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यात आता आणखी एका मृत्युची भर पडली आहे. ठाणे शहरातील रुग्णाचा मृत्यु झाला आहे.  जिल्ह्यात स्वाईन फ्लु रुग्णांच्या मृत्युंची संख्या आता १५ वर पोहचली आहे. आरोग्य यंत्रणा स्वाईन फ्लुला आळा घालण्यासाठी सचोटीचे प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे ४९६ रुग्ण झाले आहेत.               

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. दुसरीकडे स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या देखील मागील काही दिवसापासून पुन्हा वाढतांना दिसू लागली आहे. जिल्ह्यात आतार्पयत ४९६ रुग्ण आढळले असून त्यात १५ जणांचा मृत्यु झाला आहे. पैकी ३६२ रु ग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, ११९ रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. यामुळे जिल्ह्यात रु ग्ण संख्येबरोबरच मृत्युच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत असून यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक रु ग्ण आढळून येत आहेत. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या शहरात रु ग्ण आढळून येत आहेत. रु ग्ण संख्येबरोबरच मृत्युच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे.  जिल्ह्यात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात दहा दिवसांपुर्वी स्वाइन फ्लूच्या रु ग्णांची संख्या ४२२ होती.  त्यात ठाणे ३०८, कल्याण-डोंबिवली ५६, नवी मुंबई ३६, मीरा-भाईंदर ६, बदलापूर ८, ठाणे ग्रामीण चार आणि अंबरनाथमधील एक रुग्ण होते. तर, ठाणे ८, कल्याण-डोंबिवली ५ आणि अंबरनाथ १ असा एकूण १४ मृत्युची संख्या होती. परंतु गेल्या दिवसांत रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या ४९६ वर पोहचली आहे. त्यात ठाणे ३६१, कल्याण-डोंबिवली ७१, नवी मुंबई ४१, मीरा-भाईंदर ६, बदलापूर ९, भिवंडी ३, ठाणे ग्रामीण चार आणि अंबरनाथमधील एक रुग्ण आहे. मृतांची संख्या १५ वर पोहचली असून त्यात ठाणे ९, कल्याण-डोंबिवली ५ आणि अंबरनाथ १ मृताचा समावेश आहे.

टॅग्स :thaneठाणेSwine Flueस्वाईन फ्लू