शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

फक्त पाच रुपयांत एक लीटर पाणी

By admin | Updated: May 27, 2017 02:08 IST

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर सुरू करण्यात आलेल्या ‘जन जल योजने’चे लोकार्पण ज्येष्ठ प्रवासी दिलीप पामंग यांच्या हस्ते करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर सुरू करण्यात आलेल्या ‘जन जल योजने’चे लोकार्पण ज्येष्ठ प्रवासी दिलीप पामंग यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे मिनरल वॉटरपेक्षा कितीतरी स्वस्तात प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे.शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमास अन्य तातडीच्या कामामुळे खा. शिंदे उपस्थित राहू शकले नाही. या वेळी युवासेना जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख भाऊ चौधरी, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे, महिला आघाडीच्या कविता गावंड आदी मान्यवर उपस्थित होते. या योजनेमुळे प्रवाशांना पाच रुपयांत एक लीटर शुद्ध पाणी मिळणार आहे. पाच लीटर पाण्यासाठी केवळ २० रुपये मोजावे लागणार आहेत. खाजगी कंपन्यांच्या एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी सध्या २० रुपये मोजावे लागतात. काही दिवसांपूर्वी खा. शिंदे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाची पाहणी केली, तेव्हा त्या ठिकाणी व्हिडीओ गेम चालवला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. आज पुन्हा लोकार्पण सोहळ्यास खासदारांसह शिवसैनिक येणार असल्याने स्थानकात स्वच्छता ठेवण्यात आली होती. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना तासाभरासाठी पिटाळून लावले होते.