शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षात राहिलेली एक लाखांची रोकड अवघ्या सहा तासांमध्ये मिळाली परत

By जितेंद्र कालेकर | Updated: January 13, 2023 18:42 IST

खारेगाव येथील रहिवाशी सदाशिव कांबळे (४३, रा. योग अपार्टमेंट, कळवा, ठाणे)  यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली होती.

ठाणे- खारेगाव येथील रहिवाशी सदाशिव कांबळे (४३, रा. योग अपार्टमेंट, कळवा, ठाणे)  यांची एक लाखांची रोकड असलेली बॅग रिक्षात विसरली होती. ती अवघ्या सहा तासांमध्ये परत मिळवून देण्यात यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली. 

 ठाणे महापालिकेचे कर्मचारी घराच्या बुकींगसाठी दोन लाखांची रक्कम घेऊन १२ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खारेगाव येथील योग अपार्टमेंट येथून निघाले होते. या दरम्यान, ठाणे पोलीस स्कूल ते खारेगाव नाका असा रिक्षाने प्रवास करीत असताना खारेगाव नाका येथे रिक्षातून उतरले. त्याचवेळी त्यांची एक लाखांची एक बॅग कागदपत्रांसह रिक्षातच विसरली. मुलीच्या स्कूल बॅगेत ठेवलेली दुसरी एक लाखांची रोकड मात्र त्यांच्याकडे तशीच होती. रिक्षात पैशांची बॅग विसरल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने कळवा पोलिस ठाणे गाठूनही ही माहिती दिली. 

त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक घुगे, पोलिस अंमलदार राहुल पवार आणि अमोल ढावरे यांनी यातील रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या पथकाने कांबळे रिक्षात बसलेल्या ठिकाणापासून ते जिथे उतरले तिथपर्यंतच्या खारकर आळीतील पोलिस स्कूल, कळवा नाका, मनीषा नगर आणि खारेगाव नाका या परिसरातील  सुमारे ३५ सीसीटीव्हींमधील फूटेजची  दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तपासणी केली. त्यावेळी त्यांनी प्रवास केलेल्या या रिक्षाचा शोध लागला.

या दरम्यान, इतरही प्रवासी या रिक्षात बसले. परंतू, रिक्षा चालक आणि इतर प्रवाशांच्याही निदर्शनास ही बॅग आली नाही. कळव्यातच ही रिक्षा एक ठिकाणी उभी असतांना चालकाकडे विचारपूस केली, त्यावेळी रिक्षातील ही बॅग जशीच्या तशी एक लाखांच्या रोकडसह त्याने पोलिसांकडे सुपूर्द केली. पोलिसांनी ती कांबळे यांच्याकडे सोपविली. त्यावेळी त्याने पोलिसांच्या  या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे