मोहोपाडा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भाताण बोगद्याजवळ मारुती सुझुकीला झालेल्या अपघातात एक जखमी झाल्याची घटना घडली. पुण्याहून निघालेली मारुती सुझुकी कार (एम एच-०२,बीपी-५४४०) ही मुंबईच्या दिशेने निघाली असताना भाताण बोगद्याजवळ शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कारचालक सिद्धेश शिंदे (३४) याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडीत कोसळली. अपघातात कारचालक शिंदे याच्या हाताला दुखापत झाली, तर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी साईड न दिल्याने भाताणजवळच पुण्यातील एका तरुणाने डॉक्टरची गाडी अडवली आणि त्याला मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. (वार्ताहर)
एक्स्प्रेस वेवरील अपघातात एक जखमी
By admin | Updated: November 13, 2016 01:13 IST