कल्याण : कल्याण-मलंग रस्त्यावर एक दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली सापडला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे यापूर्वी दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पवार यांचा मृत्यू ही तिसरी घटना आहे. रंगीलाल पवार (३२) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. ते दुचाकीवरून कल्याण-मलंग रोडमार्गे बदलापूरला निघाले होते. त्यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यामुळे स्लीप झाली. त्यामुळे पवार खाली पडले. त्यांच्या मागून येणाऱ्या खाजगी बसच्या चाकाखाली ते सापडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांप्रकरणी पोलीस रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदार व खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)
कल्याण-मलंग रस्त्यावर खड्ड्यांमुळे एकाचा मृत्यू
By admin | Updated: November 15, 2016 04:42 IST