शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशी महोत्सवात एक कोटीची उलाढाल

By admin | Updated: April 26, 2017 23:46 IST

खापरावरच्या पुरणपोळ््या, कळणीची भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, पापड, कुरडई व अन्य कृषी उत्पादनांची एक कोटीहून

डोंबिवली : खापरावरच्या पुरणपोळ््या, कळणीची भाकरी, मिरचीचा ठेचा, वांग्याचे भरीत, पापड, कुरडई व अन्य कृषी उत्पादनांची एक कोटीहून अधिक उलाढाल कल्याणमधील साई चौकात शनिवार आणि रविवारी झालेल्या या खान्देशी महोत्सवात झाली आहे. या दोन दिवसांत ४० हजार नागरिकांनी या महोत्सवाला भेट दिली. खान्देशातील खाद्य पदार्थांचे प्रथम इतक्या मोठ्या प्रमाणावर ब्रॅ्रडिंग झाल्याचे आयोजक विकास पाटील यांनी सांगितले. खान्देशी कला व संस्कृतीची ओळख करून देणारा रंगारंग कार्यक्रमही या वेळी झाला. खान्देशी खाद्य, कला व संस्कृती तसेच कृषी उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देशी विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव भरवण्यात आला होता. या महोत्सवाला ठाणे, मुंबई व नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरातील खान्देशी नागरिक उपस्थित होते. महोत्सवाचा सांगता समारंभ भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत झाला. पाटील यांनी खास आहिराणी भाषेतून शुभेच्छा दिल्या. खान्देशी संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी मंडळाने सुरू केलेल्या उपक्रमाची प्रशंसा करून बोलीभाषेचा महत्त्व सांगितले. या वेळी अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे गटनेते वरुण पाटील, महिला व बालकल्याण सभापती वैशाली पाटील, अंबरनाथ नगरपालिकेच्या आरोग्य सभापती कल्पना गुंजाळ, हेमलता पवार, उल्हासनगरमधील नगरसेविका ज्योती पाटील, एन. एम. भामरे, दीपक महाजन, संजय बिलाले, गणेश भामरे, सुभाष वानखेडे, जयवंत पाटील यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)