शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

पाच लाखाच्या खंडणीसाठी निर्घुण हत्या करणाऱ्या एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:56 IST

भिवंडी : शहरात धामणकरनाका विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानांतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर आज शुक्रवार रोजी सकाळी ...

ठळक मुद्दे बीफच्या दुकानांतून मुलाचे अपहरणमोबाईलवरून पाच लाखाची खंडणीची मागणी मुंबई मनपा पाईपलाईनच्या अडगळीत बिलालचा मृतदेह

भिवंडी: शहरात धामणकरनाका विठ्ठलनगर येथील बीफच्या दुकानांतून अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पाच दिवसानंतर आज शुक्रवार रोजी सकाळी मुंबई-नाशिक महामार्गालगत पाईपलाईनच्या अडगळीत मिळाला.या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असुन या प्रकरणी पोलीसांनी अकास अटक केली आहे.बिलाल शकील कुरेशी(१४) असे अल्पवयीन मुलाचे नांव असुन तो निजामपूर मधील कुरेशीनगर मध्ये आपल्या आईवडीलांसोबत रहात होता. तो गेल्या रविवारी सकाळी आपल्या वडीलांसोबत धामणकरनाका माधवनगर मधील बीफच्या दुकानात आला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानकपणे तो दुकानातून अचानक गायब झाल्याने बिलालची शोधाशोध सुरू झाली. तो कोठेही न सापडल्याने त्याच्या वडीलांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात बिलाल याचे अपहरण झाल्याची तक्रार केली.दरम्यान त्याच्या वडीलांना मोबाईलवरून पाच लाखाची मागणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पोलीसांना दिली. त्याप्रमाणे पोलीसांनी तपास सुरू होता. काल रात्री दरम्यान बिलालची हत्या झाल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला असता मुंबई-नाशिक महामार्गावरील मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा करणा-या पाईपलाईन लगत अडगळीत बिलालचा मृतदेह आढळून आला. सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत पाठविण्यात आला आहे. त्याच्या गळ्याला रस्सी आवळून डोक्यात दगड घालून त्यास जीवे ठार मारल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. या प्रकरणी पोलीसांनी तपास करून वाहीद अन्सारी(२०)या तरूणांस अटक केले असुन दुसरा अल्पवयीन आरोपी आपल्या कुटूंबासह शहरातून पळून गेल्याची माहिती सुत्राकडून मिळते.त्याच्या मागावर पोलीस असुन त्यास लवकरच पकडण्यात येईल,अशी माहिती पोलीसांनी दिली. या घटनेने शहरात खळबळ माजली असुन पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMurderखून