शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षात दिव्यात ५१ रेल्वे अपघात,४२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:50 IST

दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले.

ठाणे : दिवा रेल्वे स्थानकात गेल्या दीड वर्षात सुमारे ५१ रेल्वे अपघात झाले असून, त्यामध्ये ४२ जणांना प्राण गमावले लागले. १८ जण जखमी झाले. मृतांमध्ये कानात एअरफोन घालून रेल्वे लाइन क्रॉसिंग करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे.व्यात स्वस्तात मिळणाºया घरांमुळे आणि दिवा हे जंक्शन असल्याने नागरिकांची पसंती दिव्याला मिळत आहे. त्यामुळे दिव्याचे झपाट्याने नागरीकरण होत, लोकसंख्या वाढत आहे. या नागरिकांना ये-जा करण्यासाठी लोकलशिवाय पर्याय नसल्याने कळत नकळत त्याचा परिणाम लोकलवर होत आहे. यातून दीड वर्षात दिवा रेल्वे स्थानकात लोकलमधून पडून किंवा रेल्वे रुळ ओलांडताना असे एकूण ५१ रेल्वे अपघात झाले आहेत.२०१७ या वर्षभरात ४० अपघातांची नोंद असून, त्यामध्ये २२ जणांचा मृत झाला आहे. तर १८ जण जखमी झाले होते. तसेच २०१८ मध्ये जानेवारी ते जूनमध्ये ११ अपघात झाले आहे. त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे.दिवा रेल्वे स्थानकात उतरलेले प्रवासी जाण्यासाठी पाद्चारी पूल असताना, त्याचा वापर न करता आपला जीव धोक्यात घालून रेल्वे लाईन क्रॉस करतात. एखादी लोकल आल्यानंतर जणू लोंढाच्या लोंढा रेल्वे रुळ ओलांडतात. त्यातील बहुसंख्य प्रवासी कानात इअर फोन लावून असतात.त्यातून क्रॉसिंग करताना, अपघात होण्याची शक्यता असून, ती एक चिंतेची बाब असल्याचे रेल्वे सूत्रांने सांगितले.