शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख ठाणेकर बेघर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 02:15 IST

ठाणे महापालिकेने यंदा अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केल्यानंतर अतिक्रमण विभागाने आतापर्यंत शहरातील ९५

ठाणे : ठाणे महापालिकेने यंदा अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केल्यानंतर अतिक्रमण विभागाने आतापर्यंत शहरातील ९५ अतिधोकादायक म्हणजेच सी वन प्रकारातील इमारतींपैकी ७७ इमारती रिकाम्या करून केवळ पाच इमारतींवर कारवाई केली आहे. या धोकादायक इमारतींमध्ये जवळपास १ लाख ६० हजार नागरिकांचे वास्तव्य असून, आजघडीला त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या इमारती एका आठवड्याच्या आत तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. धोकादायक इमारतींच्या सर्व्हेमध्ये जवळपास ४ हजारांपेक्षा अधिक इमारती या धोकादायक असून, यामध्ये ९०० इमारती या अधिकृत असून ३ हजार इमारती या अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे.धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींमध्ये जवळपास ४१ हजार कुटुंब वास्तव्यास आहेत. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार आता केवळ ९५ अतिधोकादायक इमारतींवर लक्ष केंद्रित करून त्या रिकाम्या करून लवकरच तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७७ इमारती रिकाम्या केल्या आहेत. मात्र, केवळ पाच इमारतींवर पालिकेला हातोडा चालवणे शक्य झाले आहे. उर्वरीत इमारती तोडण्याचे नियोजन केले असून, पावसाळ्यापूर्वी त्या तोडण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ज्या ९५ अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी १८ इमारतींमध्ये अजूनही नागरिक राहात आहेत. काही इमारतींबाबत रहिवासी न्यायालयात गेले असल्याने या इमारतींच्या कारवाईला स्थागिती मिळाली असल्याने त्यांच्यावर कारवाई करता आलेली नाही. काही इमारतीमधील रहिवाशांनी स्वत: इमारत तोडण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे म्हाडाच्या १३ अतिधोकादायक इमारतींवर कारवाईसाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनदेखील परवानगी घेतली असल्याची माहिती पालिकेने दिली.नौपाडा, मुंब्रा, कोपरी, वर्तकनगर अशा ठिकाणी अतिधोकादायक इमारती आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे सी २ ए श्रेणीमधील इमारतीदेखील रिकाम्या करणे बंधनकारक असून, पालिकेच्या वतीने मात्र त्या रिकाम्या करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आलेली नाही. अशा एकूण ११४ इमारती असून त्यामध्ये ९६५ कुटुंब वास्तव्यास आहेत.दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींची यादी २०१४ पासून प्रसिद्ध केली जात असताना अशा इमारतींवर कारवाई मात्र पावसाळ्याच्या काही दिवस आधी केली जात आहे. संपूर्ण वर्षभर अशा इमारतींवर पालिकेचे लक्ष का जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. काही इमारतींच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती आहे. तर काही रिकाम्या करूनही अद्याप तोडलेल्या नाहीत. इमारत तोडण्याचा खर्च हा इमारतीच्या मालकांमधून घेतला जात असल्याने अनेक इमारतींचे मालक तो देण्यास तयार नाहीत.