शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विशेष कक्षासह दीड लाख सर्जिकल मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 01:25 IST

रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी दीड हजार एन-९५ मास्क व दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था केली आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन संशयित रुग्णावर तातडीने उपचार करण्याची खबरदारी घेतली आहे. संशयित रुग्णांसाठी कळव्याच्या छत्रपत्री शिवाजी महाराज रुग्णालयात आठ खाटांचा विलगीकरण कक्ष उपलब्ध केला आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी दीड हजार एन-९५ मास्क व दीड लाख सर्जिकल मास्कची व्यवस्था केली आहे.महापौर नरेश म्हस्के यांनी गुरुवारी या सर्व गोष्टींचा आपल्या दालनात बैठक घेऊन आढावा घेतला. प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्याशी चर्चा करून महापौर दालन येथे वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश सोनालीकर व अधिष्ठाता शैलेश्वर नटराजन यांच्यासमवेत महापौरांनी ही बैठक घेतली. महापालिकेने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे सांगून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.परदेशांतून भारतात नागरिक येत असतात. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दररोज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शासनाचा आरोग्य विभाग आलेल्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यासोबत १४ दिवस संपर्क साधत असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी सांगितले.>वृत्तपत्रांतून आवश्यकजागृती करावीकोरोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी व याबाबत घ्यावयाची खबरदारी यासंदर्भातील माहिती देणारी भित्तीपत्रके लावून वर्तमानपत्रांतूनदेखील याबाबत आवश्यक माहिती प्रसिद्ध करावी तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून नागरिकांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. तसेच महापालिकेने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन केले.>महापालिका डॉक्टरांनातज्ज्ञांनी केले मार्गदर्शनसद्य:स्थितीत उपलब्ध असलेला औषधसाठा रु ग्णालये व आरोग्य केंद्रांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवला आहे. याबाबत महापालिकेने पूर्ण खबरदारी घेतली असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच या आजारासंदर्भात रुग्णांवर करण्यात येणारे उपचार व घ्यावयाची काळजी याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील डॉक्टरांना मार्गदर्शन केले असल्याचेही या बैठकीत सांगण्यात आले.>ठाण्यात मास्कच उपलब्ध नाहीकोरोनाबाबत लोकांमध्ये दहशत असताना ठाण्यातील औषधी दुकानांमध्ये मास्कच उपलब्ध नसल्याची माहिती उघड झाली आहे. मुळात मास्कचा पुरवठा करणाºया कंपनीकडेच मास्क नसल्याचे समजते. हा तुटवडा नैसर्गिक आहे की, मागणी वाढण्याची शक्यता हेरुन काळाबाजार करण्याची पूर्वतयारी आहे, हा खरा संशोधनाचा प्रश्न आहे.