शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

दीड लाख गणेशमूर्तींची आज प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:32 IST

ठाण्यात एक लाख ४८ हजार घरगुती : तर १,०६८ सार्वजनिक बाप्पांचे होणार धूमधडाक्यात आगमन

ठाणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाचे आगमन आज धूमधडाक्यासह मोठ्या उत्साहात होणार आहे. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत चालणाºया या गणेशोत्सवासाठी भाविकांनी जय्यत तयारी केली असून, सोमवारी ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापूर या शहरांत (ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात) सुमारे दीड लाख गणेशमूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून सोमवारी सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. प्रतिष्ठापनेसाठी भटजीपासून पूजेसाठी लागणाºया साहित्याची जय्यत तयारी झाली आहे. त्यातच, सार्वजनिक मंडळांनी शहरांमध्ये रोषणाई केली आहे. अनेक भाविकांनी रविवारीच गणरायाच्या मूर्ती वाजतगाजत घरी आणल्या आहेत. बाप्पांचे आगमन म्हणजे घरोघरी एक प्रकारचा आनंदोत्सवच असतो. गेल्या वर्षी बाप्पाला निरोप देताना, पुढील वर्षी लवकर या, असे साकडे घालणारे सारेच गणेशभक्त नवीन वर्षात बाप्पांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असतात. रविवारी अनेकांनी गणेशमूर्ती आणल्या असल्या, तरी त्यांची प्राणप्रतिष्ठा सोमवारीच होणार आहे.ठाणे पोलीस आयुक्तालयात सुमारे एक लाख ४७ हजार ३६९ गणरायाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. ठाणे शहरात १३७ सार्वजनिक, तर १९ हजार ३१५ घरगुती; भिवंडीमध्ये १६१ सार्वजनिक तर १०३५८ घरगुती; कल्याणमध्ये २८७ सार्वजनिक तर ४५ हजार १४१ घरगुती; उल्हासनगरात २८४ सार्वजनिक तर ४८१४१ घरगुती आणि वागळे परिक्षेत्रात १९८ सार्वजनिक आणि २४ हजार ५०४ घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.दीड दिवसांचे ३९ हजार ९१२, तीन दिवसांचे १५६०, पाच दिवसांच्या २८ हजार ७२४, सहा दिवसांच्या १५ हजार ६५६ , सात दिवसांच्या २० हजार २८५, दहा दिवसांच्या सहा हजार ६०३, तर ११ दिवसांच्या ३३ हजार ६५२ घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे.पाच हजार पोलीस राहणार तैनात : गणेशोत्सवासाठी स्थानिक पोलीस ठाण्यासह मुख्यालय आणि बाहेरूनही मागवलेला पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे. यामध्ये चार अतिरिक्त पोलीस आयुक्त, आठ पोलीस उपायुक्त, १८ सहायक पोलीस आयुक्त, १११ पोलीस निरीक्षक, ३४६ सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक, चार हजार ४१२ पोलीस कर्मचाऱ्यांसह सहा एसआरपीएफ कंपन्या व ७०० होमगार्ड यांचा समावेश आहे. एकूणच उत्सवावर सीसीटीव्ही कॅमेºयांद्वारे वॉच ठेवला जाणार आहे.मुस्लिम कार्यकर्त्यांचीही लगबग

कुमार बडदे

मुंब्रा : बाप्पांच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्यांचीही (बांधवांची) लगबग सुरू असल्याचे दृश्य मुंब्य्रात ठिकठिकाणी दिसत आहे. सोमवारपासून सुरू होणाºया गणेशोत्सवासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. बाप्पांच्या स्वागतामध्ये कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी येथील अनेक मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. सजावट, स्टेज, बाप्पांची आसनव्यवस्था, मंडपातील अंतर्गत तसेच बाह्य सजावट तसेच सुरक्षाव्यवस्था व्यवस्थित झाली आहे की नाही, याची ते जातीने चौकशी करून काळजी घेत असल्याची माहिती मेहमूद खान या एका गणेश मंडळातील मुस्लिम कार्यकर्त्याने लोकमतला दिली.

टॅग्स :Ganesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीthaneठाणेGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019