शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख ग्राहकांची वीजजोडणी तोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:58 IST

भाजपचे आंदोलन : महावितरणचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे :  एकीकडे कोरोनामुळे वीजग्राहकांना दिलासा देण्याची मागणी लावून धरली जात असताना दुसरीकडे महावितरणने भांडुप परिमंडळातील थकबाकीदार असलेल्या एक लाख ४४ हजार वीज ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याची मोहीम उघडली आहे. महावितणच्या या कारभाराच्या विरोधात गुरुवारी भाजपने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले.कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यात महावितरणने सरासरी हजारोंची बिले पाठवून ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यांना दिलासा द्यावा, यासाठी भाजप आणि मनसेने शासनाकडे पाठपुरावा केला होता. असे असतानाही तो देण्याऐवजी आता त्यांची वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने केले आहे. त्यानुसार बुधवारपासून भांडुप परिमंडळातील एक लाख ४४ हजार ग्राहकांची वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या या धोरणाविरोधात केळकर यांनी गुरुवारी हे आंदोलन केले. या वेळी जोपर्यंत ही वीजतोडणी मोहीम थांबत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वीजतोडणी कारवाई थांबवली जाईल, असे आश्वासन दिले. ज्यांची थकबाकी ५० हजारांहून अधिक आहे, त्यांच्याकडूनही टप्प्याटप्प्याने वसुली करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती केळकर यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :electricityवीज