शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेचे थकविले दीड कोटी; खड्डे बुजवणे महागात, छदामही दिली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 05:22 IST

दरवर्षी पावसाळ्यात ठाण्यातील रस्त्यांना खड्डे पडतात. ते बुजविण्यासाठी महापालिका प्रत्येक प्रभाग समितीनिहाय २५ लाखांच्या निधीची तरतूद करते.

ठाणे : प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडले जातात. ते महापालिका बुजवत असली, तरी संबंधित रस्ते कोणत्या प्राधिकरणाचे आहेत, याचा विचार करीत नाही. मात्र, आता इतर प्राधिकरणाचे हे खड्डे बुजविणे पालिकेच्या अंगलट आले आहे. महापालिकेने मागील वर्षी एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजविले होते. त्यासाठी एक कोटी ४० लाखांचा खर्चही केला होता. मात्र, चार वेळा पत्रव्यवहार करूनही यातील छदामही महापालिकेला मिळालेला नाही.दरवर्षी पावसाळ्यात ठाण्यातील रस्त्यांना खड्डे पडतात. ते बुजविण्यासाठी महापालिका प्रत्येक प्रभाग समितीनिहाय २५ लाखांच्या निधीची तरतूद करते. इतर प्राधिकरणांचे रस्तेही पालिकेच्या माध्यमातून बुजविले जात असतात. परंतु, तरीही त्यांची परिस्थितीही जैसे थे दिसते. मागील वर्षीदेखील या रस्त्यांची चाळण झाली होती. त्यामुळे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ते कोणाचेही असोत, आधी ते बुजविण्यात यावेत, असे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेच्या बांधकाम विभागाने हे खड्डे बुजविले होते. यामध्ये घोडबंदर आणि तीनहातनाका, नितीन कंपनी आदी भागांतील एमएसआरडीसी आणि एमएमआरडीएच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांचे खड्डे बुजविले होते. एमएसआरडीसीच्या रस्त्यांच्या कामांसाठी ७५ लाखांचा आणि एमएमआरडीएच्या रस्त्यांवर ६५ लाख रुपये खर्च केले होते. हा खर्च मिळावा म्हणून महापालिकेने पत्रव्यवहार केला होता. मात्र, अद्यापही हा खर्च संबंधित प्राधिकरणांकडून मिळू शकलेला नाही.चार वेळा पत्रव्यवहारमागील वर्षीचा खर्च न मिळाल्याने पालिकेने यंदा या प्राधिकरणावरील रस्त्यांवरील खड्डे बुजविलेले नाहीत. त्यामुळे आजही घोडबंदरच्या उड्डाणपुलावर आणि तीनहातनाका पुलावर खड्डे आहेत. आता हा खर्च मिळावा म्हणून सलग चौथ्यांदा पत्रव्यवहार केल्याची माहिती नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली. तसेच वेळ पडल्यास स्वत: जाऊन पैसे मिळावेत म्हणून विनंती करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका