शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा तोंडावर मात्र उल्हासनगरात नालेसफाई व रस्ता दुरस्तीला मुहूर्त नाही, निविदा प्रक्रियेत घोळ?

By सदानंद नाईक | Updated: May 21, 2024 18:05 IST

याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

उल्हासनगर - शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई व रस्ता दुरुस्तीला मुहूर्त लागत नसल्याने, नाल्या शेजारील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली. अचानक पाऊस सुरू झाल्यास तुंबलेल्या नाल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.

 उल्हासनगरात वालधुनी नदी व्यतिरिक्त खेमानी नाला, गुलशननगर नाला, गायकवाड पाडा आदी लहान-मोठे नाले कचऱ्याने तुंबले असून नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी पोखलन, जेसीबी मशीन व डंपरच्या सहाय्यताने केली जाते. तसेच लहान नाल्याची सफाई हंगामी कामगाराद्वारे केली जाते. मात्र नालेसफाईचा ठेका निविदा प्रक्रियेत अडकल्याने, पुढील महिन्यात नाले सफाईचा मुहूर्त निघण्याची शक्यता महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त रस्त्यातील खड्डे भरण्याचे कामही पावसाळ्यापूर्वी केले जाते. मात्र अद्यापही रस्ता दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे भरण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे भरले नाहीतर, नागरिकांच्या असंतोषाचा सामना महापालिकेला करावा लागणार आहे.

पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, उपायुक्त सुभाष जाधव दरवर्षी प्रमाणे मोठ्या व लहान नाल्याची सफाई पावसाळ्यापूर्वी केली जाते. मात्र निवडणूक आचारसंहितामुळे नाले सफाईची निविदा काढण्यास विलंब झाला असलातरी, नाले सफाई पावसाळ्यापूर्वी होणार आहे. 

रस्ते दुरुस्ती लवकरच, उपायुक्त किशोर गवसशहरात भुयारी गटार योजना, एमएमआरडीए अंतर्गत मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असल्याने, बहुतांश रस्ते खोदलेले आहेत. तसेच जिओ कंपनी अंतर्गत रस्त्याच्या दोन्ही बाजूने केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने, रस्ते खड्डेमय झाले. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण होताच रस्ते दुरुस्ती व रस्त्यातील खड्डे बुजविण्याला सुरवात होणार आहे.

वालधुनी नदी कचऱ्याने तुंबली शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचे पाणी सखल भागात व किनारी वसलेल्या झुडपट्टीत घुसत असल्याने, जीवित व वित्तीय नुकसान होते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदीची सफाई केली जाते. यावर्षी नदी सफाईला विलंब।झाल्याने, स्थानिक नागरिक पुराचे पाणी घरात घुसण्याची भीती व्यक्त करीत आहेत.