शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओमींचे आठवडाभरात भाजपात सीमोल्लंघन?

By admin | Updated: October 7, 2016 05:19 IST

मुंबई आणि ठाण्यात भाजपच्या जागा वाढल्या, तरी पूर्णपणाने सत्ता हाती येण्याची चिन्हे नसल्याने उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला

उल्हासनगर : मुंबई आणि ठाण्यात भाजपच्या जागा वाढल्या, तरी पूर्णपणाने सत्ता हाती येण्याची चिन्हे नसल्याने उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला सामावून घेत सत्ता संपादनाच्या दृष्टीने भाजपाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या देवदर्शन करीत असलेले ओमी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटतील आणि आठवडाभरात त्यांचे राजकीय सीमोल्लंघन होईल, असे समजते. फक्त ओमी यांना पक्षात प्रवेश द्यायचा की त्यांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून युती करायची याबाबत भाजपा नेत्यांची चर्चा सुरू आहे. ती झाली की लगेचच सीमोल्लंघन होण्याची शक्यता आहे. ओमी कलानींना प्रवेश देण्याबाबत स्थानिक पदाधिकारी मौन बाळगून असले तरी गेल्या आठवडयात पक्षातील एका गटाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पत्र पाठवून ओमी टिमच्या प्रवेशामुळे भाजपाची शहरात ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्थापितांच्या एका गटाने विरोधाचा सूर लावला आहे. कोअर कमिटीच्या नावाखाली बैठक घेवून ओमी टीमच्या प्रवेशाला विरोध केला आहे. पण शत-प्रतिशत भाजपाच्या स्वप्नासाठी वरिष्ठ नेते त्यांच्या प्रवेशाला अनुकूल असल्याचे सांगितले जाते. विरोधाचा ठराव कोअर कमिटीने मंजूर करून नेत्यांकडे पाठविल्याची माहिती शहराध्यक्ष व माजी आमदार कुमार आयलानी यांनी दिली. तरीही ओमी टीमला प्रवेश देण्याबाबत वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ओमी टीमची मदत होणार असल्याने प्त्या टीमला थेट पक्षात प्रवेश द्यायचा की त्यांच्या गटाशी युती करायची याबर चर्चा करीत आहेत. ओमींचा स्वतंत्र गट ठेवण्यापेक्षा त्यांना पक्षात घेतल्यास अधिक फायदा होईल, असे एका गटाचे म्हणणे आहे. पक्षाचे हे धोरण ठरत नसल्याने ओमी यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा लांबली आहे. ती दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.