शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ओमी कलानी टीमला रिपाइं ऐक्याच्या युतीचे डोहाळे

By admin | Updated: December 22, 2016 05:44 IST

महापालिका निवडणुकीत रिपाइं ऐक्याच्या चर्चेने भाजपात अस्वस्थता असताना दुसरीकडे ओमी कलानी टीमलाही रिपाइं ऐक्याच्या

उल्हासनगर : महापालिका निवडणुकीत रिपाइं ऐक्याच्या चर्चेने भाजपात अस्वस्थता असताना दुसरीकडे ओमी कलानी टीमलाही रिपाइं ऐक्याच्या युतीचे डोहाळे लागले आहेत. ओमी कलानी यांनी तसे संकेत दिले असून ऐक्याचे समन्वयक रमेश व्हटकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षासोबत युतीची प्रतिक्रिया यापूर्वीच दिली आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपाच्या युतीवर प्रश्नचिन्ह आहे. रिपाइं आठवले गटाची भाजपासोबत युती आहे. मात्र, ऐन निवडणुकीदरम्यान ऐक्याचे वारे वाहू लागले असून रिपाइंच्या गटातटांच्या स्थानिक नेत्यांनी बैठका घेणे सुरू केले आहे. जुने नेते किसन जाधव, रमाबाई भालेराव, शांताराम निकम, कवाडे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, वरिष्ठ नेते बी.बी. मोरे, आंबेडकर गटाचे शहर जिल्हाध्यक्ष शेषराव वाघमारे आदींनी पुढाकार घेतला आहे. या ऐक्याच्या चर्चेत ऐक्यवादी रिपाइंच्या अध्यक्षीय मंडळातील सदस्य रमेश व्हटकर यांनी उडी घेतल्याने ऐक्याच्या चर्चेला उधाण आले.रिपाइं ऐक्यवादी नेत्यांनी शिवसेना-भाजपासोबत युती नाही, असे संकेत दिल्याने त्याचा सर्वाधिक फटका भाजपाला बसणार आहे. या प्रकाराने भाजपात अस्वस्थता पसरली. तर, ओमी कलानी टीममध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. त्यांनी ऐक्यवादी रिपाइंसोबत युतीचे संकेत दिले आहेत. शहर भाजपाची प्रतिमा मलिन असून बहुतांश स्थानिक नेत्यांवर व त्यांच्या नातेवाइकांवर अवैध बांधकामप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. महापालिका सत्तेत येण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांनी ओमी टीमच्या प्रवेशाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रवेशाच्या नुसत्या चर्चेने भाजपात उभी फूट पडून एका गटाने पाठिंबा, तर दुसऱ्या गटाने विरोध केला होता. पक्षातील फूट थांबवण्यासाठी हा प्रवेश लांबवल्याची चर्चा शहरात होत आहे. (प्रतिनिधी)