शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:47 IST

ओमी कलानींसह टीमच्या सदस्यांनी सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या आनंदात, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर व्हायरल केले.

उल्हासनगर : ओमी कलानींसह टीमच्या सदस्यांनी सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याच्या आनंदात, राष्ट्रवादीचे गटनेते भरत गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर व्हायरल केले. याबाबत, गंगोत्री यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हिललाइन पोलिसांनी ओमी कलानींसह चार जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या प्रकाराने ओमी कलानी विरुद्ध भरत गंगोत्री पुन्हा आमने-सामने आल्याने, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्र-१७ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर भरत गंगोत्री, सुनीता बगाडे, पूजा कौर लभाना आणि सतरामदास जेसवानी हे निवडून आले. पूजा कौर लभाना यांची त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँगे्रसच्या जया साधवानी यांनी जातपडताळणी समितीकडे तक्रार केली असता, समितीने लभाना यांचे नगरसेवकपद अवैध ठरवले. त्यानुसार, प्रभाग क्र.-१७ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. यावेळी गंगोत्री यांच्या उमेदवार सुमन सचदेव यांच्याविरोधात भाजपाने ओमी टीमच्या उमेदवाराला उभे केले. गंगोत्री यांच्याविरोधात भाजपा, ओमी टीम, साई पक्ष असा सामना रंगला. मतदानाच्या दिवशी हाणामारी होऊन अस्तित्वाच्या लढाईत गंगोत्री यांच्या सुमन सचदेव यांनी बाजी मारली. पोटनिवडणुकीत ओमी कलानी यांचे अस्तित्व पणला लागले होते; मात्र त्यांना यश मिळाले नाही.राष्ट्रवादीच्या मात्र गंगोत्री गटाच्या सुमन सचदेव ओबीसी गटातून निवडून आल्या. त्यांनी ओमी टीमच्या मात्र भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या साक्षी पमनानी, काँगे्रसच्या जया साधवानी यांचा पराभव केला. जया साधवानी यांनी सुमन सचदेव यांच्याविरोधात जातपडताळणी समितीकडे धाव घेऊन सचदेव यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचा दावा केला.त्यानुसार, जिल्हा जातपडताळणी समितीने सुमन सचदेव यांचे नगरसेवकपद रद्द ठरवल्याने, ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी, कमलेश निकम, सागर माखिजा व दीपा मनुजा यांनी गंगोत्री यांच्या फोटोवर चिटर लिहून सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. गंगोत्री यांनी पोलिसांत धाव घेतल्यावर चौघांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकाराने पुन्हा ओमी कलानी व गंगोत्री आमने-सामने आले असून आगामी पोटनिवडणुकीत याचे पडसाद उठणार असल्याचे बोलले जात आहे.सुमन सचदेवयांनी ठोठावला न्यायालयाचा दरवाजाजिल्हा जातपडताळणी समितीने सुमन सचदेव यांच्या ओबीसी जातप्रमाणपत्राची चौकशी करून, गेल्या आठवड्यात सचदेव यांचे नगरसेवकपद अवैध ठरवले. याविरोधात त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावून तक्रारदार जया साधवानी यांच्या जातप्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उभे केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर