शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ओमी कलानींना हवे पॅकेज

By admin | Updated: January 11, 2017 07:24 IST

माझ्या भाजपा प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची पहिल्यांदाच कबुली देताना उल्हासनगरच्या विकासासाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती

उल्हासनगर : माझ्या भाजपा प्रवेशासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची पहिल्यांदाच कबुली देताना उल्हासनगरच्या विकासासाठी पॅकेज द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती ओमी कलानी यांनी दिली. तीन महिन्यांपूर्वीच ही चर्चा झाली होती. त्यात डम्पिंग ग्राऊंड, पाणी योजना, मलनिस्सारण केंद्र आदी योजनांसाठी पॅकेजची मागणी केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्या पॅकेजची घोषणा होत नसल्यानेच माझा भाजपा प्रवेश लांबल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उल्हासनगरच्या राजकारणात गेले काही महिने ओमी कलानी आणि त्यांची टीम भाजपात जाणार का? या एकाच मुद्द्यावर चर्चा रंगली आहे. शिवसेना-भाजपा-रिपाइंची युती, राष्ट्रवादीचे अस्तित्व, साई पक्षाची भूमिका, मनसेचे ओमींसोबत जाणे हे सारे त्या निर्णयावर अवलंबून आहे. त्याला अखेर ओमी यांनीच पूर्णविराम दिला. ठाण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान येत्या गुरूवारी ते भाजपात प्रवेश करतील, असा अंदाज त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.गेल्या आठवडयात थेट मुख्यमंत्र्यांनीच प्रवेशाचा प्रस्ताव पाठविल्याचे ओमी यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शहर विकासासाठी विशेष पॅकेज जाहीर करा, अशी अट फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत घातली होती, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. महापालिकेचे उत्पन्न मर्यादित आहे. त्यातून शहराचे मोठे प्रकल्प मार्गी लागू शकत नाहीत. त्यासाठी राज्य सरकारकडून पॅकेजची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांना पटवून दिल्याचे ते म्हणाले. पालिकेला विकासासाठी पॅकेज मिळाले, तर पाण्याचा प्रश्न मार्गी लावता येईल. सांडपाण्याच्या प्रश्नावर काम करता येईल. तसेच उल्हासनगरच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रश्नालाही न्याय देता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.त्यावर दोन दिवसांत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. (प्रतिनिधी)