शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटीश कालीन कल्याणचा जुना पत्री पूल सर्व वाहनांसह पादचाऱ्यांसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 16:41 IST

कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्यां सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून होईल. जड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच

ठळक मुद्देब्रिटिश राजवटीत बांधलेला कल्याण येथील पूर्व - पश्चिमेस जोडणारा जुना पत्री पूलसर्व प्रकारच्या वाहनांना ये - जा करण्यास कायमचा बंदजड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच

ठाणे : ब्रिटिश राजवटीत बांधलेला कल्याण येथील पूर्व - पश्चिमेस जोडणारा जुना पत्री पूल पादचाऱ्यांसह सर्व प्रकारच्या वाहनांना ये - जा करण्यास कायमचा बंद करण्यात आला. यासाठीची ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी शनिवारी  अधिसूचना काढली आहे. या पुलावरील वाहतूक नव्या पुलावरून वळवण्यात आली आहे.कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथील पत्रीपुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या दिशेने जाणाऱ्यां तसेच दुर्गाडीकडून सूचक नाक्याकडे येणाऱ्यां सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. ही सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून होईल. जड - अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून तेही रात्री ११ ते पहाटे ५ वाजेच्या कालावधीतच सुरू ठेवली जाणार आहे.मध्य रेल्वे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने ब्रिटीश कालीन जुना पत्री पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णत: बंद करावा अशी सुचना जारी केली होती. पण यापूर्वी जुना पत्री पूल हा हलक्या वाहनांसाठी सुरु ठेवण्याची परवानगी होती. तसी अधिसूचना जुलैमध्ये वाहतूक विभागाने काढली होती. परंतु, आता सुरक्षिततेच्या कारणास्तव व खबरदारीची उपाययोजना म्हणून या जुन्या पत्री पुलावरील संपूर्ण वाहतूकच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठीची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाने आज जारी केली. यामुळे ब्रिटीश कालापासून सुरू असलेली व मध्यंतरी काही दिवस बंद केलेली वाहतूक आता अनिश्चित कालावधीसाठी कायमची बंद केल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

टॅग्स :thaneठाणेcollectorजिल्हाधिकारी