शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:42 IST

आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली.

- पंकज पाटीलअंबरनाथ : आमदार किसन कथोरे यांनी पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या सर्व अधिकाऱ्यांची मंगळवारी हजेरी घेतली. प्राधिकरणाकडून होणाºया चुकांची चर्चा करण्यात आली. तसेच या कामचुकार अधिकाऱ्यांची कथोरे यांनी हजेरी घेत सर्व अधिकाºयांना नियोजनबद्ध काम करण्याची ताकीद दिली. या पुढे त्याच त्याच चुकांची पुनरावृत्ती झाल्यास ही योजना हस्तांतर करण्याचा विचार केला जाईल, असे कथोरे यांनी बजावले.‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘पाणी मिळाले, निधीही मिळाला, वितरणाचे काय?’ या मथळ््याखालील बातमीनंतर कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाच्या अंबरनाथ आणि बदलापुरातील सर्व अधिकाºयांना बैठकीकरिता बोलावून घेतले. जीवन प्राधिकरण पाणी वितरण व्यवस्थेतील त्रुटींना पाटबंधारे विभागालाही जबाबदार धरत असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनाही या बैठकीला बोलाविण्यात आले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी ५० दशलक्ष लीटर्स पाणी उपलब्ध झालेले असले तरी त्याचे वितरण करण्यात अनेक अडचणी येत आहेत. वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत योजनेच्या दुसºया टप्प्यात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी योजनेच्या कामानंतरही जीवन प्राधिकरण पाण्याचे योग्य नियोजन आणि वितरण करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याचे नियोजन करतांना आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र ते करीत असतांना त्याचा त्रास हा नागरिकांना होत आहे. एक दिवस वितरण व्यवस्था बंद राहिल्यावर त्याचा फटका हा पुढे दोन दिवस सहन करावा लागत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या हेतूने आमदार कथोरे यांनी ही बैठक घेतली. या बैठकीला जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पालांडे या देखील हजर होत्या. कथोरे यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच अमृत योजनेतून सुरू असलेल्या कामांबाबत कथोरे यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजनेचे काम करताना मोठ्या प्रमाणात विलंब होत असल्याच्या तक्रारी येत असल्याचे कथोरे यांनी स्पष्ट केले. अंबरनाथबाबत ठेकेदार कामचुकारपणा करीत असल्याची बाब कथोरे यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली. कामाला विलंब करणाºया ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचे आदेश त्यांनी दिले. काम करताना अस्तित्वातील लोकवस्तीचा विचार न करता भविष्यात निर्माण होणारी लोकवस्तीचा विचार करून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अंबरनाथ आणि बदलापूरच्या पाणी वितरण व्यवस्थेबाबत माहिती घेतली असता जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता पालंडे यांनी पाणीगळतीचे प्रमाण ही डोकेदुखी असल्याचे स्पष्ट केले. तब्बल ३७ टक्के पाणीगळती असल्याने पाणी तुटवडा त्यामुळे निर्माण होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नवीन योजना झाल्यावर ही गळती कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, जुन्या वाहिन्या सुरूच राहिल्याने गळतीचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढले. १० ते १५ दशलक्ष लीटर्स पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, जीवन प्राधिकरण १०० दशलक्ष लीटर्स पाणी उचलत असेल आणि त्यातील ४० दशलक्ष लीटर्स पाणी वाया जात असेल तर ही मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले.लहान धरणे बांधण्याची गरजठाणे जिल्ह्यात पाणी नाही, अशी ओरड सर्वच नेते करीत असतात. मात्र, ते पाणी आणण्यासाठी लहान लहान धरणे बांधण्यासाठी कोणी पुढे सरसावत नाहीत. तालुक्यात आणि जिल्ह्यात लहान धरणे उभारणे ही काळाची गरज आहे. मोठी धरणे उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे लहान धरणे हाच एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा विचार करताना पाण्याचे स्रोत निर्माण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.